शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी समीर भुजबळांचं नाव घेऊन धमकी दिली नाही'; सुहास कांदेंचा खुलासा
2
निवडणुकीचे टेन्शन...! उमेदवाराने मतदान केंद्रावर प्राण सोडला; बीडमधील घटना
3
बिटकॉइन प्रकरण : "त्या ऑडिओ क्लिपमधील आवाज सुप्रिया सुळे आणि नाना पटोलेंचाच”; अजित पवार स्पष्टच बोलले 
4
“पराभव निश्चित असल्याने भाजपाकडून सुप्रिया सुळे, नाना पटोलेंवर आरोप”: बाळासाहेब थोरात
5
वर्ध्यात कराळे मास्तरांना भररस्त्यात मारहाण; भाजप कार्यकर्त्याने हल्ला केल्याचा दावा
6
“काँग्रेस एक नंबरचा पक्ष ठरेल, मविआचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेष”: नाना पटोले
7
‘तो’ आवाज सुप्रिया सुळेंचा...; देवेंद्र फडणवीसांसोबत अजित पवारांनीही स्पष्टच सांगितलं
8
अमेरिकेने युक्रेनमधील दुतावास बंद केला; बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याने रशिया खवळला
9
झारखंडने महाराष्ट्राला पछाडले! तिकडे दुपारी एक वाजेपर्यंत ४७.९२ टक्के, इकडे एवढेच मतदान
10
५५ सेकंदाचा Video, ६ पानांची चिठ्ठी...; गर्लफ्रेंड करायची ब्लॅकमेल, तरुणाने उचललं 'हे' पाऊल
11
"ही माणसं धोकेबाज निघाली, त्यांनी..."; उद्धव ठाकरे गटाचा काँग्रेसवर निशाणा
12
गूढ वाढलं..! शेजाऱ्यांनी ऐकला भांडणाचा आवाज, मृत्यूपूर्वी हर्षितासोबत काय घडलं?
13
IND vs AUS: रोहित, गिल, शमी संघात नाहीत; 'या' खेळाडूचा कसोटी 'डेब्यू' जवळपास निश्चित
14
हार्दिक पांड्या बनला T20 क्रमावारीत नंबर १! तिलक वर्माचाही Top 3 मध्ये दिमाखात प्रवेश
15
Fact Check : रोहित शर्माच्या मुलाच्या नावाने 'ते' फोटो होताहेत व्हायरल; जाणून घ्या, 'सत्य'
16
Kedar Dighe : केदार दिघेंवर पैसे वाटप केल्याचा शिंदे गटाचा आरोप, पोलिसांत गुन्हा दाखल
17
लेकीचं नाव 'ऐजाह' ठेवल्यामुळे ट्रोल झाली टीव्ही अभिनेत्री, आले आक्षेपार्ह मेसेज; म्हणाली...
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: बारामतीत राडा! शर्मिला पवारांचा मतदारांना दमदाटी केल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?
19
'या' इलेक्ट्रिक टू व्हीलरचा जलवा, वर्षभरात विक्री 10 लाखांच्या पुढे!
20
अखिलेश यादव यांच्या आरोपांनंतर EC ची मोठी कारवाई; निवडणूक आयोगाने दिल्या सूचना, अनेक अधिकारी निलंबित

‘फॅटस्’ बरोबर मैत्री

By admin | Published: October 14, 2015 11:58 PM

सिटी टॉक

आपल्या आहारातील सर्वांत बदनाम घटक कोणता आहे? विचार न करताही सर्वांना यांचे उत्तर माहीत आहे. फॅटस्चे कारण आपण नेहमी ऐकत असतो की, फॅटस् जास्त खाल्ले तर वजन वाढते, शरीर बेढव होते, रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे येतात, ह्रदयविकाराचा, पक्षाघाताचा झटका येतो, वगैरे वगैरे. प्रत्येकाला वाटत असते की, आपल्या शरीरात फॅटस् तेवढे नसावेत. कुणी फॅटस्ना ओझे असे म्हणतात, कुणी टायर म्हणून संबोधतात. कुणाला पोटावरचे फॅटस् नको असतात, तर कुणाला लोंबकळणाऱ्या दंडावरचे. इतके च काय जाडजूड दिसणाऱ्या व्यक्तींना इंग्रजीमध्ये ‘फॅट पीपल’ असाच शब्द आहे. मग खरेच फॅटस् खाऊच नयेत का?  फॅटस् म्हणजे मराठीत स्निग्ध पदार्थ आणि ते सरसकट वाईटच असतात, असे आजिबात नाही. उलट स्निग्ध पदार्थ आपल्या शरीरामध्ये खूप महत्त्वाच्या भूमिका निभावत असतात. आपला मेंदू ज्या घटकांनी बनतो, त्यामध्ये साठ टक्क्यांहून आधिक वाटा हा स्निग्ध पदार्थांचा असतो. मेंदूपासून निघणाऱ्या नसांचे आवरणही स्निग्ध पदार्थांपासून बनते. ह्रदय आवरणही स्निग्ध पदार्थांपासून बनते. ह्रदय, मूत्रपिंडे, यकृत, फुप्फुसे या शरीरातील महत्त्वाच्या अवयवांना दुखापत होऊ नये, त्यांचे छोट्या-मोठ्या आघातांपासून संरक्षण व्हावे, यासाठी त्यांच्या भोवताली जे सुरक्षाकवच असते ते स्निग्ध पदार्थच असतात. तसेच काही जीवनसत्त्वांचे शोषण करून घेणे, सांध्याना वंगण पुरविणे, चेहऱ्यावरील तजेला कायम ठेवणे, अशी अनेक कार्य हे पदार्थ करीत असतात. एक ग्रॅम स्निग्ध पदार्थांमधून नऊ किलो कॅलरी इतकी ऊर्जा मिळते. जी शरीर वापरतेच; परंतु जास्त राहणारी ऊर्जा स्निग्ध पदार्थांचे आवरण बनवून शरीर त्वचेखाली साठवून ठेवत असते. जेव्हा आपण आजारी पडतो, तेव्हा पोषण मूल्यांची गरज वाढते; परंतु अन्नावरील वासना उडाल्याने जेवण व्यवस्थित खाल्ले जात नाही. अशावेळी लागणारे अतिरिक्त उष्मांक हे शरीरातील स्निग्ध पदार्थांचा साठा वापरून उपलब्ध केले जातात. कधी जेवण वेळेवर मिळाले नाही, उपासमार झाली (जी हल्ली बरेचजण ू१ं२ँ ्िरी३ मुळे करवून घेतात) तर, यावेळी मदतीस धावून येतात ते फक्त स्निग्ध पदार्थ. ज्यामुळे आपण आजारी पडत नाही. गर्भारपणामध्ये पोटातील बाळाची योग्य वाढ होणे, प्रसूतीनंतर पुरेशा दुधाची निर्मिती होणे, शरीराचे तापमान नियंत्रित करणे यासाठी सुद्धा स्निग्ध पदार्थांची आवश्यकता असते. तुम्ही म्हणाल फॅटस् खावे तरी पंचाईत, नाही खावे तरी पंचाईत. नक्की करायचे तरी काय? स्निग्ध पदार्थांच्या सेवनाबाबत लोकांच्या मनात खूपच गोंधळ असतो. किती खायचे, काय खायचे, तेल वापरायचे की तूप, कुठले तेल वापरावे, शरीरात असणारे फॅटस् कसे बाहेर निघतात. मी याबद्दल निरनिराळ्या लोकांकडून इतके प्रश्न, इतक्या समजुती, गैरसमजुती ऐकल्या आहेत की, मला वाटते येथून पुढचे सगळे लेखसुद्धा मी फॅटस्वर लिहू शकेन. पण, हा विषय वाटतो तितका क्लिष्ट नाही. फक्त आपल्याला निवड करता आली पाहिजे. चांगल्या आणि वाईट फॅटस्मधून स्निग्ध पदार्थांचे त्यांच्या संरचनेनुसार वेगवेगळे प्रकार आहेत. तुम्ही जर एखाद्या व्यक्तीचा रक्ताचा रिपोर्ट पाहिलात, तर त्यामध्ये टोटल कोलेस्टेरॉल, ट्रायग्लिसेराइटस्, एचडीएल, अशा वेगवेगळ्या घटकांची पातळी लिहिलेली असते. डॉक्टर पेशंटना सल्ला देतात की, चांगले कोलेस्टेरॉल वाढवा आणि वाईट कोलेस्टेरॉल कमी करा. म्हणजे नक्की काय खायचे आणि काय टाळायचे या विषयावर पुढच्या लेखात. - डॉ. शिल्पा जाधव - लेखिका प्रसिद्ध आहारतज्ज्ञ आहेत.