शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

विद्यापीठ बंद करण्याची सुपारी घेतलीय का?; प्राध्यापक भरतीवरुन कोल्हापुरात युवा सेनेचा हल्लाबोल 

By पोपट केशव पवार | Published: December 12, 2023 5:52 PM

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठात पूर्वी २१० प्राध्यापक कार्यरत होते. परंतु गेल्या आठ ते दहा वर्षात ही संख्या ९० प्राध्यापकांवर ...

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठात पूर्वी २१० प्राध्यापक कार्यरत होते. परंतु गेल्या आठ ते दहा वर्षात ही संख्या ९० प्राध्यापकांवर आली. काही विभागात एकही प्राध्यापक नाही. तर काही विभागात एकाच प्राध्यापकावर काम सुरु आहे. शासनाने विद्यापीठांना सहाय्यक प्राध्यापक नोकर भरती करण्यासाठी मान्यता दिली. पण, विद्यापीठ प्रशासनाची उदासीनता व कुलगुरुंचे दुर्लक्ष यामुळे प्राध्यापक भरती केलेली नाही. भविष्यात हे विद्यापीठ बंद करण्याची सुपारी प्रशासनाने घेतली आहे का ?असा सवाल करत युवा सेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गट मंगळवारी विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारात हल्लाबोल आंदोलन केले.ग्रामीण भागातील नवतरुण विद्यापीठात कायम प्राध्यापक होण्यासाठी प्रतीक्षेत आहेत. यातील एक -दोन प्राध्यापकांनी या दिरंगाईला कंटाळून आत्महत्याही केली आहे. परंतु, या प्रशासनाला त्याची चिंता नाही. विद्यापीठातील कर्मचाऱ्यांची संख्याही दिवसेंदिवस कमी होत आहे. आपली कार्यपद्धती बदलून विद्यापीठाला मोकळा श्वास द्यावा, अन्यथा येणाऱ्या काही दिवसात युवासेना अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फसल्याशिवाय स्वस्त बसणार नाही, असा इशारा देण्यात आला.कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे यांनी विद्यापीठातील प्रश्न लवकरच मार्गी लावू असे आश्वासन दिले.युवा सेना जिल्हा युवा अधिकारी मंजीत माने, योगेंद्र माने, प्रदीप हांडे, फिरोज मुलानी, शेखर बारटक्के,सानिका दामूगडे माधुरी जाधव, प्रिया माने, अक्षय घाडगे, रघु भावे उपस्थित होते.

शिक्षण क्षेत्रात राजकारण नकोयुजीसीच्या सूचनेनुसार पंतप्रधानांचा फोटो असलेला सेल्फी पॉईंट प्रत्येक महाविद्यालयाच्या बाहेर लावण्याची जाहीर केले आहे. हा प्रकार शिक्षण क्षेत्रात राजकारण घुसडल्या सारखा आहे, या निर्णयावर आपण काय भूमिका घेतली आहे असा सवाल युवा सेनेने केला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShivaji Universityशिवाजी विद्यापीठShiv Senaशिवसेना