शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
4
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
5
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
6
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
7
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
8
Success Story : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
9
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
10
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
11
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
13
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
14
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
15
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
16
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
17
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
18
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
20
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चाने ‘गोंधळ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 6:21 PM

कोल्हापूर जिल्हा गोंधळी, जोशी, वासुदेव, बागडी समाज मंडळाच्यावतीने सोमवारी आपल्या विविध मागण्यांसाठी विराट मोर्चा काढत शासनाला जाग आणण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘आई-दादा उदं-उदं बोला’ अशा सुरात संभाळ वाद्यांसह गोंधळ घातला.

ठळक मुद्देगोंधळी, जोशी, वासुदेव, बागडी समाजाचा मोर्चा मागण्या मान्य न झाल्यास मंत्रालयावर धडक

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा गोंधळी, जोशी, वासुदेव, बागडी समाज मंडळाच्यावतीने सोमवारी आपल्या विविध मागण्यांसाठी विराट मोर्चा काढत शासनाला जाग आणण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘आई-दादा उदं-उदं बोला’ अशा सुरात संभाळ वाद्यांसह गोंधळ घातला.

शासनाने मागण्या मान्य न केल्यास भविष्यात राज्यभरातून मंत्रालयावर मोर्चा काढण्याचाही इशारा यावेळी देण्यात आला. समाज मंडळाचे अध्यक्ष व इचलकरंजीचे माजी नगराध्यक्ष सुभाष भोजणे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. मोर्चात महिलांचा सहभाग लक्षणीय होता. मोर्चाला शिवसेनेच्या जिल्ह्यातील आमदार व नेत्यांनी उपस्थित राहून पाठिंबा दर्शविला.मोर्चाला दसरा चौकातून प्रारंभ झाला. मोर्चा व्हिनस कॉर्नर, असेंब्ली रोड मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. मोर्चामध्ये गोंधळी समाजाच्यावतीने शासनाला जाग आणण्यासाठी संभाळ वाद्यासह ‘उदं गं अंबे’चा गजर संपूर्ण मार्गावर केला. गोंधळी वाद्याच्या तालावर नाचत सहभागी झाले होते. मोर्चात प्रत्येकजण डोक्यावर ‘आम्ही गोंधळी’ लिहिलेल्या भगव्या टोप्या परिधान करून, खांद्यावर भगवे, लाल-पिवळे झेंडे घेऊन सहभागी झाले होते. अनेकांच्या हातात मागण्यांचे फलक झळकत होते.मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचल्यावर तेथे समाज मंडळाचे अध्यक्ष सुभाष भोजणे यांनी, समाजाच्या मागण्या मान्य न केल्यास भविष्यात मंत्रालयावर मोर्चा काढण्यासाठी एकजुटीने सज्ज रहा, असे आवाहन केले. कार्याध्यक्ष बबन कावडे यांनीही, सरकारवर टीका करीत मागण्या मान्य करण्यासाठी प्रसंगी पायातील हातात घेण्याची वेळ सरकारने आणू नये, असाही इशारा दिला.आमदार सुजित मिणचेकर यांनी, समाजाच्या मागण्यांबाबत शिवसेनेचे सर्व आमदार, नेते तुमच्या पाठीशी असून, अधिवेशनात प्रश्न उपस्थित करून आवाज उठविण्याची ग्वाही दिली. आमदार राजेश क्षीरसागर आणि जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धैयशील माने हेही मोर्चात सहभागी झाले होते. शिष्ठमंडळाच्यावतीने निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांना निवेदन दिले.मोर्चात, अध्यक्ष सुभाष भोजणे, कार्याध्यक्ष बबन कावडे, अभिजित गजगेश्वर, बाळासाहेब काळे, महेश भिसे, विजय काळे, परिवहन सभापती राहुल चव्हाण, नगरसेवक दिलीप पवार, इचलकरंजीच्या नगरसेविका लक्ष्मीबाई धातुंडे, उदय धातुंडे, रत्नाकर विटेकरी, बाळासाहेब धुमाळ, शंकर धातुंडे, सदाशिव सरवदे, अभिजित भिसे, कल्पना जोशी, आदी सहभागी झाले होते.

डोक्यावर भांडी, पिंजऱ्यात पोपटजोशी समाजाचा फिरून भांडी विक्रीचा व्यवसाय असल्याने मोर्चात डोक्यावर बुट्टीत भांडी घेऊन अनेक महिला सहभागी झाल्या होत्या, तर पोपटांचे पिंजरे डोक्यावर घेऊन पुरुष मोर्चात सहभागी झाले होते.

पारंपरिक वेशात गोंधळी, वासुदेवमोर्चात गोंधळी समाजाचे कार्यकर्ते गळ्यात कवड्यांची माळ, डोक्यावर पगडी, अंगात लाल झब्बा, अशा गणवेशात संभाळ वाद्य वाजवत सहभागी झाले होते. वासुदेव समाजाचे कार्यकर्ते डोक्यावर मोरपिसांची पगडी, हातात लटकणारी टाळ वाजवत, पांढऱ्या गणवेशात सहभागी झाले होते.

मागण्या

  1. भारत सरकार नियुक्त व दादा इदाते आयोग समितीची शिफारशी लागू करा.
  2. गोंधळी, जोशी, वासुदेव, बागडी समाजाची जातनिहाय जनगणना करावी.
  3. एससी, एसटीच्या धर्तीवर भटक्या विमुक्तांसाठी स्वतंत्र तिसरी सूची कायमस्वरूपी आयोगाला घटनात्मक दर्जा द्यावा.
  4.  जातीच्या दाखल्यासाठी १९६१ पूर्वी दाखल्याची अट रद्द करून शासन जीआर २००८ प्रमाणे पुनर्जिवित करावे.
  5. शासकीय गायरानच्या जमिनी गोंधळी, जोशी, वासुदेव, बागडी समाजासाठी घरकुल योजनेला द्याव्यात.
  6.  गोंधळी, जोशी, वासुदेव, बागडी समाजाला २.५ टक्के आरक्षण असून, ते आता जनगणनेच्या प्रमाणात वाढवून मिळावे.
  7. भटक्या विमुक्त जाती जमातीसाठी क्रिमिलर अट सरसकट रद्द करावी.

 

 

टॅग्स :Morchaमोर्चाkolhapurकोल्हापूर