शहरं
Join us  
Trending Stories
1
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
2
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
3
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
6
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
7
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
8
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
9
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
10
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
11
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
13
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
14
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
15
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
16
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
17
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
18
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
19
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण
20
IPL मेगा लिलावाआधी Shreyas Iyer पेटला! ज्या संघाला चॅम्पियन केलं त्यांनी दिला 'नारळ'; आता...

इचलकरंजी पालिकेवर मोर्चा

By admin | Published: April 22, 2016 12:36 AM

नागरी सुविधांची मागणी : नगराध्यक्षा, मुख्याधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे

इचलकरंजी : जवाहरनगरमधील फकीर मळा परिसरात रस्ते, गटारी, दिवाबत्ती आणि नळ पाणी अशा मूलभूत सुविधा मिळण्याच्या मागणीसाठी त्या परिसरातील नागरिकांनी नगरपालिकेवर मोर्चा काढून सुमारे दोन तास ठिय्या आंदोलन केले. त्या परिसरामध्ये कूपनलिका खोदून पिण्याच्या पाण्याची सोय ताबडतोब करण्यात येईल व अन्य सुविधा लवकरात लवकर पूर्ण करून देण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे व मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांनी दिल्यानंतर हे आंदोलन संपुष्टात आले.जवाहरनगरमधील हनुमाननगर आणि फकीर मळा येथील प्रत्येकी चार गल्ल्यांमध्ये अनुक्रमे भुयारी गटार योजनेबरोबरच रस्ते, गटारी, दिवाबत्ती आणि पाण्याचे नळ ताबडतोब मिळावेत, या मागणीसाठी सुमारे चारशेहून अधिक महिला व पुरुषांनी पालिकेवर मोर्चा काढला होता. राजू बोंद्रे व संतोष कांदेकर यांच्या नेतृत्वाखालील हा मोर्चा पालिकेमध्ये येताच तेथील प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन करण्यात आले. सुमारे दीड तासाच्या आंदोलनानंतर नगराध्यक्षा बिरंजे व मुख्याधिकारी रसाळ मोर्चाला सामोरे गेले.यावेळी परिसरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या बोंद्रे व कांदेकर यांनी मांडल्या. यावर मुख्याधिकारी डॉ. रसाळ म्हणाले, फकीर मळा परिसरामधील रस्त्यांच्या जमिनी ताब्यात घेण्याचे काम लवकरात लवकर केले जाईल. तसेच नजीकच्या एक ते दोन आठवड्यांच्या काळात कूपनलिका खोदून नागरिकांची पाण्याची गैरसोय दूर करू. यावेळी उपनगराध्यक्ष महावीर जैन, अतिरिक्त मुख्याधिकारी प्रज्ञा पोतदार, शहर विकास आघाडीचे पक्षप्रतोद अजित जाधव, पाणीपुरवठा सभापती दिलीप झोळ, नगरसेविका बिस्मिल्ला मुजावर, नगरसेवक रवी रजपुते, शशांक बावचकर, जलअभियंता ए. एन. जकीनकर, अभियंता संजय बागडे, नगररचना अधिकारी बबन खोत, कामगार अधिकारी विजय राजापुरे, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)तथाकथित नेत्यांना नगराध्यक्षांचा टोलाआंदोलनकर्त्यांसमोर भाषण करताना फकीर मळा परिसरातील सेवा-सुविधा सहानुभूतीने नागरिकांना पुरविल्या जातील, असे सांगत नगराध्यक्षा बिरंजे म्हणाल्या, निवडणुका जवळ आल्यामुळे जागे झालेल्या तथाकथित नेत्यांनी मोर्चेबाजी न करता पालिकेतील कामकाजातील तांत्रिक बाजू समजावून घ्याव्यात. आपणच आपल्या समस्यांची सोडवणूक करावयाची आहे. निव्वळ टीकात्मक घोषणाबाजीने कामे होत नाहीत.