मुरगूड : मुरगूड (ता. कागल) येथील हजरत गैबी पीर देवालयाच्या समोर असणाºया जागेवर नगरपालिकेने सभागृह व मुस्लिम समाजासाठी बालवाडीचे बांधकाम सुरू केले होते. उरुसाला अडचण करणाºया या बांधकामाला उरूस समिती सदस्यांनी आणि नागरिकांनी विरोध केला होता. शिवाय बांधकाम बंद पाडले होते. पालिकेने या ठिकाणी बांधकाम करू नये या मागणीसाठी मंगळवारी उरूस समिती आणि नागरिकांनी पालिकेवर मोर्चा काढला. यावेळी या प्रश्नासाठी आपण पालिकेची विशेष सभा बोलवू आणि यावर सविस्तर चर्चा करून मार्ग काढू, असे आश्वासन मुख्याधिकारी संजय गायकवाड यांनी दिले.
मंगळवारी सकाळी तुकाराम चौकातून या मोर्चाला सुरुवात झाली. एस. टी. स्टँड मार्गे हा मोर्चा पालिका आवारात आला. याठिकाणी मुख्याधिकारी संजय गायकवाड यांच्यासमोर नागरिकांनी तीव्र भावना व्यक्तकेल्या.प्रा. चंद्रकांत जाधव, माजी उपनगराध्यक्ष संतोष वंडकर, माजी उपनगराध्यक्ष पांडुरंग भाट, माजी उपनगराध्यक्ष दगडू शेणवी, अमित भोई आदींनी मनोगत व्यक्त केले. मुख्याधिकारी संजय गायकवाड यांनी आपण धार्मिक तेढ निर्माण होणार नाही याची काळजी घेऊ. पालिकेच्या विशेष सभेत आपण या प्रश्नावर चर्चा घडवून योग्य निर्णय घेऊ, असे आश्वासन उरूस समितीच्या पदाधिकाºयांना दिले.
मोर्चामध्ये नगरसेवक राहुल वंडकर, भगवान लोकरे, रवी परीट, आनंदा मांगले, गजानन साळोखे, सुरेश साळोखे, युवराज सूर्यवंशी, राजेंद्र चव्हाण, समितीचे अध्यक्ष समाधान दरेकर, अमित भोई, चंद्रकांत जाधव, बाजीराव रणवरे, नगरसेवक रवी परीट, राजू सोरप, राजेंद्र मगदूम, दिगंबर परीट, अबिद जमादार, अनिल रणवरे, विनायक वाघणेकर, जयवंत गायकवाड, विजय गोधडे, शिवाजी गोंधळी, रमेश परीट, चंद्रकांत कुंभार, आदी सहभागी झाले होते.मुरगूड (ता. कागल) येथे गैबी पीर देवालयाच्या समोरील रिकाम्या जागेत पालिकेने कोणतेही बांधकाम करू नये यासाठी गैबी पीर उरूस समितीने आणि नागरिकांनी मोर्चा काढून मुख्याधिकारी संजय गायकवाड यांना निवेदन दिले. यावेळी प्रा. चंद्रकांत जाधव, पांडुरंग भाट, संतोष वंडकर, अमित भोई, समाधान दरेकर, आदी उपस्थित होते.