शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

सावकरांना रोखण्यासाठी पन्हाळ्यात आघाडी

By admin | Published: November 02, 2016 1:12 AM

कळे, कोतोली नरकेंना, उर्वरित मतदारसंघ प्रत्येकाकडे : भारतआप्पा, आबा, नरके, अमर पाटील, बाबासाहेब पाटील यांची मोट

राजाराम लोंढे ल्ल कोल्हापूर जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत माजी मंत्री विनय कोरे यांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात रोखण्यासाठी मातब्बर नेत्यांनी कंबर कसली आहे. आमदार सत्यजित पाटील, आमदार चंद्रदीप नरके, भारत पाटील, अमर पाटील, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर यांनी एकत्रित मोट बांधली आहे. नरकेंना दोन तर उर्वरित मतदारसंघ प्रत्येकाला देण्यावर समझोता झाल्याचे समजते. जिल्ह्णात उद्यास येणारी राजकीय समीकरणे पाहिली तर जिल्हा परिषदेवर एक हाती सत्ता कोणत्याच पक्षाची येण्याची शक्यता कमी आहे. दोन-तीन पक्षांना एकत्रित येऊनच सत्तेचे गणित सोडवावे लागणार आहे. जिल्हा परिषदेवर सत्ता येण्यासाठी करवीर, हातकणंगले, शिरोळसह पन्हाळा तालुक्याची महत्त्वाची भूमिका राहते. विद्यमान सभागृहात कॉँग्रेसला ‘स्वाभिमानी’चा टेकू आहे, मागील सभागृहात पहिल्या अडीच वर्षांत राष्ट्रवादीला ‘जनसुराज्य’ पक्षाचा टेकू होता. आगामी सत्तेच्या राजकारणात विनय कोरे यांची भूमिका महत्त्वाची ठरणार असल्याने त्यांना पन्हाळा तालुक्यातच रोखण्याची व्यूहरचना सर्वच विरोधकांची आहे. त्यामध्ये पारंपरिक मित्रपक्ष असलेला राष्ट्रवादीही काही मागे नाही. पन्हाळा तालुक्यात जिल्हा परिषदेच्या सातवे, कोडोली, यवलूज, कोतोली, कळे, पोर्ले तर्फ ठाणे असे सहा तर पंचायत समितीचे बारा मतदारसंघ आहेत. गतवेळेला जनसुराज्य पक्षाने सातवे, कोडोली, यवलूज, पोर्ले तर्फ ठाणे अशा चार जागा जिंकल्या होत्या. आमदार नरके यांनी कळे तर आमदार सत्यजित पाटील यांनी कोतोली मतदारसंघ आपल्याकडे राखला होता. पंचायत समितीत मात्र कोरे यांना अपेक्षित न आल्याने पहिली अडीच वर्षे त्यांना सत्तेबाहेर थांबावे लागले. ‘जनसुराज्य’ने भाजपशी संधान साधल्याने कोरे यांना सत्तेची ताकद मिळणार आहे. अशा परिस्थितीत त्यांना रोखण्यासाठी सर्वच राजकीय विरोधकांना एकत्र येणे गरजेचे होते. यासाठी आमदार नरके, आमदार पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष भारत पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अमर पाटील, जिल्हा बँकेचे संचालक बाबासाहेब पाटील हे कोरे यांच्या विरोधात मोट बांधणार आहेत. तशी प्राथमिक चर्चा झाली असून कोणत्या जिल्हा परिषद मतदारसंघात कोणाची ताकद आहे, त्यानुसार जागांचे वाटप केले जाणार आहे. त्यानुसार कळे, यवलूज किंवा कोतोली आमदार नरके यांना तर यवलूज किंवा कोतोलीपैकी एक सत्यजित पाटील यांना देण्यावर जवळपास एकमत झाले आहे. पोर्ले तर्फ ठाणेमधून बाबासाहेब पाटील हे आपल्या पत्नींना रिंगणात उतणार आहेत. सातवेमधून अमर पाटील हे स्वत: रिंगणात उतरणार आहेत, तिथे त्यांना सर्वच नेत्यांनी ताकद द्यावची आहे, अशी चर्चा झाली आहे. पंचायत समितीच्या जागांची वाटपही ज्याच्याकडे जिल्हा परिषद त्याच्या अंतर्गत पंचायत समिती त्याच पक्षाला देण्यावर चर्चा झाली आहे. एखाद्या ठिकाणी अपवादात्मक दुसऱ्या पक्षाचा ताकदीचा उमेदवार असेल तर जागांची अदलाबदल करण्याची तयारीही या नेत्यांची आहे. एकंदरीत सर्वच विरोधक ताकदीने एकवटले तर कोरे यांच्यासमोरील अडचणी वाढू शकतात. नरकेंची चाचपणी! आमदार नरके यांचे बंधू अजित नरके यांना कोतोली मतदारसंघातून रिंगणात उतरण्याच्या हालचाली आहे. कोतोली अंतर्गत बाजारभोगाव मतदारसंघ हा नरके यांचा बालेकिल्ला आहे. अध्यक्षपद खुले असल्याने ‘अजित’यांना तेथून उभे करण्यासाठी कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. विश्वेश कोरे यांची राजकीय एंट्री जिल्हा परिषदेपासून करावी, अशा हालचाली सुरू असून सातवे मतदारसंघातून त्यांना रिंगणात उतरण्याची खेळीही होऊ शकते. यवलूज आबांकडे राहणे शक्य अजित नरके यांना कोतोलीतून रिंगणात उतरायचे म्हटले तर नरके यांना यवलूज सत्यजित पाटील यांना द्यावा लागणार. यवलूजमधील निम्मी गावे शाहूवाडीत आहेतच, पडळ, सातार्डे, माजगांव, शिंदेवाडी, खोतवाडी, माळवाडी ही गावे पूर्वी शाहूवाडी मतदारसंघातच होती. त्यामुळे सत्यजित यांना मतदारसंघाची अदलाबदल करण्यात अडचण राहणार नाही.