शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
2
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
3
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
4
अदानींना डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दिलासा मिळणार? नवं सरकार मागे घेऊ शकते लाचखोरीचा खटला
5
धक्कादायक! संतापलेल्या महिला सफाई कर्मचाऱ्याने सरपंचाला केली चपलेने मारहाण
6
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित ऑस्ट्रेलियात पोहचताच कोच गंभीर परतणार मायदेशी; जाणून घ्या त्यामागचं कारण...
7
'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला
8
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
9
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 
10
Gold Silver Price Today 26 November: सोनं ४,२३० आणि चांदी १०,२४० रुपयांनी झालं स्वस्त; आता इतक्या किंमतीत मिळतंय १० ग्राम सोनं
11
धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...
12
पुढील वर्षी २०२५ मध्ये सिनेप्रेमींना मिळणार बॉलिवूडची मेजवानी! हे बहुचर्चित सिनेमे होणार रिलीज
13
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
14
Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर
15
राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने
16
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
17
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
18
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?
19
"एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री व्हायचं नसेल, तर..."; रामदास आठवलेंनी सांगितला तोडगा
20
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?

पहिली उचल 3100! स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन मागे; दत्त दालमियाचे धुराडे सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2022 7:49 AM

एफआरपीची पहिली उचल जाहिर केल्याशिवाय कारखाना सुरू करू नये.आशा आशयाचे निवेदन जिल्ह्यातील विविध शेतकरी संघटनेने प्रसासनाला दिले होते.

- सरदार चौगुले

पोर्ले तर्फ ठाणे : आसुर्ले-पोर्ले (ता.पन्हाळा) येथील दत्त (दालमिया भारत शुगर) साखर कारखान्याची पहिल्या उचलीबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि दालमिया प्रशासन यांच्यात ऊस दराबाबत सकारात्मक चर्चा होऊन एफआरपीची पहिली उचल ३१०० रूपये घोषित केल्यानंतर संघटनेने आंदोलन मागे घेतले.दालमिया शुगरने यंदाच्या गळीत हंगामासाठी पहिली उचल ३०७५ जाहिर केल्याच्या निषेधार्थ कारखान्याची  ऊस वाहतुक आणि ऊसतोड बंद केली होती.आज ऊसदराबाबत सकाळची चर्चा फिस्कटल्याने संघटनेने आंदोलन तिव्र केले होते. 

      एफआरपीची पहिली उचल जाहिर केल्याशिवाय कारखाना सुरू करू नये.आशा आशयाचे निवेदन जिल्ह्यातील विविध शेतकरी संघटनेने प्रसासनाला दिले होते.बुधवारी सकाळी दालमिया प्रशासनाने एफआरपीची पहिली उचल ३०७५ रूपये जाहिर करून गळीत हंगामाचा श्रीगणेशा करण्याच्या तयारीत असताना, अपेक्षेप्रमाणे दालमियाने पहिली उचल जाहिर न केल्याच्या निषेधार्थ स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कारखान्याकडे ऊसाने भरून आलेल्या पाच वाहनांना गेट समोर आडवले आणि त्यांना परतीचा मार्ग दाखवला.आंदोलनाच्या दुसऱ्यादिवशी संघटनेने वाहतुक रोखून आंदोलनाची धार तिव्र केली.पोलिस प्रशासन आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या विचारात प्रशासन आणि आंदोलनात समेट घडवत पहिल्या उचलीत २५ रूपये वाढ करून ३१०० रूपये जाहिर केले.दरम्यान आंदोलनाला यश मिळाल्यानंतर संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कारखान्या गेट समोर साखर पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला.

     याप्रसंगी असिस्टंट जनरल मॅनेजर (केन) संग्राम पाटील, मॅनेजर (केन) शिवप्रसाद देसाई, संघटनेचे युवाध्यक्ष विक्रम पाटील, तालुकाध्यक्ष रामराव चेचर, दगडू गुरवळ,  उमेश शेलार, बाबूराव शेवडे, शिवाजी शिंदे, नारायण पाटील, बाळू कोठावळे, महादेव झेंडे (पडळ), विक्रम पाटील (वाघवे) आदींसह पोलिस प्रशासन, संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखाने