कोल्हापूर : चालू गळीत हंगामात शासनाने जाहीर केलेल्या उसाची ‘एफआरपी’ एकरकमी व १४ दिवसांच्या आत द्यावी, खरीप हंगामातील धान्याच्या खरेदीसाठी खरेदी केंद्रे सुरू करावीत, यासह विविध मागण्यांचे निवेदन सोमवारी शेतकरी कामगार पक्षाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना दिले.
शेकापक्षाचे राज्य सह सरचिटणीस संपतराव पवार-पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.निवेदनातील मागण्या अशा, खरीप हंगामातील पिकांना शासनाने जाहीर केलेला हमीभाव हा उत्पादनखर्चाचा विचार करता न परवडणारा आहे तरीही जाहीर केलेला हमीभाव शेतकºयांना मिळण्यासाठी व शेतीमालाची पडत्या भावाने बाजारपेठेत विक्री होऊ नये यासाठी शासकीय खरेदी केंद्रे करणे गरजेची आहेत. जिल्ह्णात अद्याप ही केंद्रे सुरू नाहीत. गेली ३ वर्षे यासाठी मागणी केली जात आहे; परंतु त्याची अंमलबजावणी होत नाही.
चालू गळीत हंगामात शासनाने जाहीर केलेली उसाची एफआरपीची रक्कम एकरकमी व १४ दिवसांच्या आत मिळण्यासाठी व त्यानंतर दिल्यास १४ टक्के व्याज देण्याची अंमलबजावणी करण्यात यावी. वीज दरवाढ, डिझेल दरवाढ, खतांची दरवाढ यामुळे दैनंदिन होणारी महागाई व यांच्या प्रमाणात शेतीमालाला न मिळणारा दर, न परवडणारा दुधाचा दर यामुळे शेतकरी आर्थिक अरिष्ठात सापडला आहे.शिष्टमंडळात भारत पाटील, दत्तात्रय पाटील, दिलीपकुमार जाधव, बाबूराव कदम, अशोकराव पवार-पाटील, बाबासाहेब देवकर, अजित देसाई, अमित कांबळे, बाबूराव पाटील, भगवान कांबळे, संजय डकरे, पांडुरंग हवालदार, दत्तात्रय निकम, सुशांत बोरगे, आनंदा खराडे, शरद नलवडे आदींचा समावेश होता.चालू गळीत हंगामात शासनाने जाहीर केलेल्या उसाची ‘एफआरपी’ एकरकमी द्यावी, या मागणीचे निवेदन सोमवारी शेतकरी कामगार पक्षाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना दिले. यावेळी संपतराव पवार-पाटील, बाबासाहेब देवकर, केरबा पाटील, भारत पाटील, आदी उपस्थित होते.