शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

कांद्यासह फळांची आवक २५ टक्क्यांनी घटली, पावसाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2019 3:03 PM

    कोल्हापूर : गेल्या तीन दिवसांपासून संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाल्याने, कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत येणाऱ्या आवकेवर ...

ठळक मुद्देकांद्यासह फळांची आवक २५ टक्क्यांनी घटलीपावसाचा फटका : भाजीपाल्याची आवक, दरातही चढउतार

 

 

कोल्हापूर : गेल्या तीन दिवसांपासून संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाल्याने, कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत येणाऱ्या आवकेवर परिणाम झाला आहे. कांद्यासह फळांची आवक २५ ते ३० टक्क्यांनी घटली आहे. भाजीपाल्याची आवकही कमी-जास्त होत असून दरातही चढउतार दिसत आहेत.कोल्हापुरात शिरोळ, हातकणंगलेसह आजूबाजूच्या गावांतून येणाऱ्या भाजीपाल्याचे प्रमाण जास्त आहे. याशिवाय शेजारच्या कर्नाटकच्या उत्तर भागातून भाजीपाला मार्केट यार्डात येतो. तीन दिवसांपासून सर्वच भागांत अतिवृष्टीसदृश पाऊस पडत आहे. शिवारात पाणी साचल्याने तयार भाजीपाला काढण्यावर मर्यादा आल्या आहेत. परिणामी सौद्यासाठी येणाऱ्या मालाचे प्रमाण कमी झाले आहे.पालेभाज्यासह दोडका, काकडीसारख्या वेलवर्गीय फळभाज्यांना जास्त पाऊस चालत नाही. शिवारात पाणी तुंबले की त्यांची मुळे कुजून उत्पन्नावर परिणाम होतो. बाजारातील भाज्यांची आवकही कमी झाली आहे. चार दिवसांपूर्वी कोथिंबिरीची आवक ३१००० पेंढी होती, ती आता २३ हजारांवर आली आहे. दरातही १०० रुपयांनी कमी आहे.

मेथीची आवक एक हजाराने वाढली आहे. दरातही शेकड्यामागे १०० ने वाढ झाली आहे. ओल्या वाटाण्याची आवक केवळ ३० पोती असली तरी दरात २०० रुपयांनी घसरणच दिसत आहे. गवार, घेवड्याची आवक केवळ २० टक्केच आहे.बाजारात मध्यप्रदेश, कर्नाटकसह परदेशांतून फळे येतात; पण पूरस्थितीमुळे वाहतुकीवर परिणाम झाल्याने आवक २५ ते ३० टक्क्यांनी रोडावली आहे. मोसंबी, सफरचंद, डाळींब आणि सीताफळ वगळता अन्य फळांची आवकच झालेली नाही. दर मात्र स्थिर आहेत. तीन दिवसांपूर्वी पपई, आलुबंकर, पिअर्स, पपई, पेरू, चिक्कू, केळी, किव्ही, खजूर, आंबा दशेरी यांची आवक होती.ओली मिरची १०० ने कमी, तर आले ४०० रुपयांनी वाढलेओल्या मिरचीची आवक बाजारात दुप्पट झाली असून, दरात निम्म्याने घसरण झाली आहे. १० किलोंना ३०५ रुपये असणारा दर १८५ वर आला आहे. हीच परिस्थिती आल्याची झाली आहे. त्याची आवक फक्त ७८ पोती असून दरही तीन दिवसांपूर्वीच्या तुलनेत ४०० रुपयांनी वाढून प्रती १० किलो १००० रुपये झाला आहे.

कांद्याच्या आवकेवरही परिणाम

कांद्याच्या आवकेवरही परिणाम झाला आहे. मार्केट यार्डामध्ये रोज ३० ते ४० ट्रक कांदा येतो. गुरुवारी झालेल्या सौद्यावेळी केवळ २५ ट्रक इतकाच कांदा आला. कांद्याची प्रतही खालावली असल्याने त्याला उठाव नाही. दरातही क्विंटलमागे २० ते ३० रुपयांची सुधारणा दिसत आहे. 

 

टॅग्स :Marketबाजारkolhapurकोल्हापूर