कोल्हापूर : अखिल भारतीय मराठा महासंघाच्यावतीने शिवराज्याभिषेक दिन कोरोना सुरक्षा सेवा सप्ताह साजरा करण्यात येत आहे. याअंतर्गत महासंघाच्या महिला आघाडीकडून बुधवारी मंगळवार पेठेतील बालकल्याण संकुलामध्ये फळवाटप करण्यात आले.
या महासंघाचे जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील आणि जिल्हा महिला अध्यक्षा शैलजा भोसले यांच्या हस्ते केळी, सफरचंद आदी फळे बालकल्याण संकुलातील कर्मचाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आली. या वेळी डॉ. संदीप पाटील, नीता लाड, संयोगीता देसाई, प्रकाश पाटील, दीपक मुळीक, महादेव केसरकर, प्रकाश पाटील, अवधूत पाटील आदी उपस्थित होते. रुईकर कॉलनी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळे तयार करून कमी किमतीत घराघरांत पोहचविणाऱ्या गरीब कुटुंबांना आज, गुरुवारी सायंकाळी पाच वाजता शिधावाटप करण्यात येणार आहे, अशी माहिती अवधूत पाटील यांनी दिली.
फोटो (०२०६२०२१-कोल- शिवराज्याभिषेक दिन सप्ताह) : कोल्हापुरात गुरुवारी अखिल भारतीय मराठा महासंघाच्यावतीने शिवराज्याभिषेक दिन कोरोना सुरक्षा सेवा सप्ताहाअंतर्गत बालकल्याण संकुलातील मुलांसाठी शशिकांत पाटील, शैलजा भोसले यांच्या हस्ते कर्मचाऱ्यांकडे फळे सुपूर्द करण्यात आली. या वेळी महासंघाचे अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.