कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या विकासाच्या अनुषंगाने सर्व बाबतींत कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांना पूर्ण सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही विद्यापीठ विकास आघाडीच्या वतीने देण्यात आली.विकास आघाडीच्या वतीने प्राचार्य क्रांतिकुमार पाटील आणि विद्यापीठ प्राचार्य संघटनेच्या वतीने डॉ. डी. आर. मोरे यांनी कुलगुरू डॉ. शिर्के यांचा सत्कार करण्यात आला. विद्यापीठाच्या सर्व विभागांची डॉ. शिर्के यांना माहिती आहे. त्यांच्या रूपाने विद्यापीठाला कार्यकुशल प्रशासक मिळाले आहेत. त्यांना सर्व बाबतींत सहकार्य केले जाईल, असे विकास आघाडीच्या वतीने प्राचार्य पाटील यांनी सांगितले.
शहर आणि ग्रामीण भागांतील महाविद्यालयांच्या प्रश्नांची डॉ. शिर्के यांना जाण आहे. त्यामुळे सर्व महाविद्यालयांना निश्चितपणे लाभ होईल, असे भैय्या (प्रताप) माने यांनी सांगितले.
यावेळी आमदार राजूबाबा आवळे, प्रा. डी. यू. पवार, डॉ. जे. एफ. पाटील, जयंत आसगांवकर, डॉ. प्रताप पाटील, चित्रलेखा कदम, प्रा. मोहन राजमाने, डी. जी. कणसे, संजय जाधव, मधुकर पाटील, सागर डेळेकर, भाग्यश्री जाधव, विनोद पंडित उपस्थित होते. एल. जी. जाधव यांनी स्वागत केले. व्ही. एम. पाटील यांनी आभार मानले.विद्यापीठाच्या नावलौकिकासाठी कार्यरतसर्व घटकांना सोबत घेऊन विद्यापीठाला देशातील एक सर्वोत्तम विद्यापीठ म्हणून नावलौकिक मिळावा यासाठी कार्यरत राहीन, अशी ग्वाही डॉ. शिर्के यांनी दिली.