कोल्हापूर महानगरपालिकेच्या रायगड कॉलनी-जरगनगर या प्रभागातील ज्योतिर्लिंग कॉलनी-जरगनगर रस्त्यावरील पूल २०१९ साली अतिवृष्टीमुळे वाहून गेला होता. सदरचा पूल पुन्हा बांधावा, अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली होती. त्यानुसार हा पूल पुन्हा बांधण्यासाठी शासनाच्या नगरोत्थान योजनेतून १ कोटी २० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या पुलाची पाहणी पालकमंत्री सतेज पाटील, दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील यांनी शुक्रवारी केली. लवकरात लवकर हा पूल उभारून या परिसरातील नागरिकांची सोय करा, अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या.
या वेळी महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, प्रभारी शहर अभियंता नारायण भोसले, माजी नगरसेवक मधुकर रामाने, उपशहर अभियंता एन. एस. पाटील, रामकृष्ण ठाकूर, अशोक कुलकर्णी, सुधीर चरणकर, युवराज गुरव यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.
फोटो : २८ जरगनगर पूल
ओळ : कोल्हापूर महानगरपालिकेच्या रायगड कॉलनी-जरगनगर या प्रभागातील ज्योतिर्लिंग कॉलनी जरगनगर रस्त्यावरील वाहून गेलेल्या पुलाची पाहणी करताना पालकमंत्री सतेज पाटील, दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील.