शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
5
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
6
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
7
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
8
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
9
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
10
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
11
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

अयोध्येतील राम मंदिरासाठी पश्चिम महाराष्ट्रात निधी संकलन अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2021 12:30 PM

Ram Mandir Funds Sangli- अयोध्येतील श्रीराम मंदिरासाठी सांगली जिल्ह्यात निधी संकलनास प्रारंभ झाला. १ ते ३१ जानेवारीअखेर मोहिम राबविण्यात येत असून त्याला प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याची माहिती विश्व हिंदू परिषदेचे महामंत्री दादा वेदक यांनी दिली.

ठळक मुद्देअयोध्येतील राम मंदिरासाठी पश्चिम महाराष्ट्रात निधी संकलन अभियानमुंबईच्या उद्योजकाकडून ६० कोटींचे कळस

सांगली : अयोध्येतील श्रीराम मंदिरासाठीसांगली जिल्ह्यात निधी संकलनास प्रारंभ झाला. १ ते ३१ जानेवारीअखेर मोहिम राबविण्यात येत असून त्याला प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याची माहिती विश्व हिंदू परिषदेचे महामंत्री दादा वेदक यांनी दिली.मंदिरासाठी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासतर्फे निधी संकलन महाअभियान सुरु झाले आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुण्यासह सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत जानेवारी महिन्यात निधी संकलन सुरु आहे. पहिल्या पंधरवड्यात मोठा निधी संकलनाअंतर्गत मोठ्या दात्यांशी संपर्क साधण्यात येत आहे.

याअंतर्गत दोन हजारांपासून पुढे निधी संकलीत केला जाईल. व्यापारी, उद्योजक, व्यावसायिक आदींनी अत्यंत चांगला प्रतिसाद दिल्याचे वेदक म्हणाले. या निधीसाठी देणगीदारांना आयकरात सूट मिळाली आहे. दुसर्या पंधरवड्यात जिल्ह्यातील ७३५ गावांत विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व रामभक्त असे तीन हजार कार्यकर्ते घरोघरी पोहोचतील.

१० रुपये, १०० रुपये व १००० रुपयांच्या कुपनांद्वारे निधी संकलन होईल. या धनसंग्रहाच्या माध्यमातून घरोघरी संपर्कही साध्य केला जाणार आहे. देशभरात ४ लाख गावांतील ११ कोटी कुटुंबांपर्यंत कार्यकर्ते पोहोचणार आहेत. सांगली जिल्ह्यात दोन हजार महिला दुर्गा व साडेतीन हजार कार्यकर्ते निधी संकलन मोहिमेत सहभागी होतील.वेदक म्हणाले की, राम मंदिर व बाबरी मस्जिद हा संघर्ष हिंदू-मुस्लिम संघर्ष, नव्हता, तर तो राष्ट्रीय व आराष्ट्रीय असा होता. सर्वोच्च न्यायालयाने ६७ एकर जागा राम मंदिर न्यासाला देऊन त्यावर निर्णायक व सर्वमान्य तोडगा काढला. पुढील एक हजार वर्षे टिकेल असे तीन मजली मंदिर तेथे उभा राहत आहे. त्यामध्ये प्रत्येकाने आपला आर्थिक सहभाग द्यावा.पत्रकार बैठकीला जिल्हा संघचालक विलास चौथाई, सांगली, सातार्याचे विभागीय कार्यवाह प्रा. सुनील कुलकर्णी, जिल्हा कार्यवाह नितीन देशमाने, निधी समितीचे जिल्हा प्रमुख सुहास जोशी, सहप्रमुख संजीव तचव्हाण, योगेश शिरगुरकर, मोठा निधी प्रमुख शैलेंद्र तेलंग, विनायक राजाध्यक्ष आदी उपस्थित होते.मुंबईच्या उद्योजकाकडून ६० कोटींचे कळस

मुबंईतील बैठकीत एका उद्योजकाने श्रीराम मंदिरासाठी पाच सोन्याचे कळस देण्याचे जाहीर केले. त्यांची किंमत साठ कोटी रुपये होते.रामभक्त मुस्लिमांचाही निधी स्वीकारणारवेदक म्हणाले की, श्रीराम मंदिर उभारणीसाठी रामभक्त मुस्लिमही पुढे आले तर त्यांच्याकडूनही निधी स्वीकारला जाईल. शिवाय सर्व रामभक्तांकडून रोख पैशांसोबतच सोने-चांदीही स्वीकारले जाईल. 

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरfundsनिधीSangliसांगली