शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
3
सिंधू पाणी करार मोडल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
4
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
5
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
6
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
7
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
8
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
9
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
10
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
11
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
12
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
13
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
14
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
15
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
16
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
17
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
18
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
19
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
20
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली

वृध्दापकाळ, विधवा, दिव्यांग योजनेचे साडेदहा कोटी आले; दोन वर्षांनी लाभार्थ्यांना मिळणार पैसे

By इंदुमती सूर्यवंशी | Updated: January 4, 2025 15:35 IST

केंद्र शासनाची योजना 

इंदुमती गणेशकोल्हापूर : केंद्र शासनाच्या इंदिरा गांधी वृद्धापकाळ, विधवा, दिव्यांग तसेच कुटुंब लाभ या चार योजनांच्या निधीला तब्बल दोन वर्षांनी मुहूर्त लागला आहे. केंद्राने या योजनांचे १० कोटी ५८ लाख ७६ हजार ६९० रुपये इतका निधी जिल्हा प्रशासनाकडे वर्ग केला असून तो लाभार्थ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यासाठी तालुक्यांना पाठवण्यात आला आहे. पुढील चार दिवसांत ही रक्कम लाभार्थ्यांना मिळेल.दारिद्रय रेषेखालील निराधार व दिव्यांगांसाठी राज्य शासनाच्या वतीने संजय गांधी व श्रावणबाळ या दोन योजना चालवल्या जातात. तर केंद्राच्या वतीने इंदिरा गांधी वृद्धापकाळ, इंदिरा गांधी विधवा योजना, इंदिरा गांधी दिव्यांग या योजनांसाठी निधी दिला जातो. या दोन्ही योजनांच्या समन्वयातून राज्य शासनाचे १३०० रुपये व केंद्र शासनाचे २०० रुपये असे प्रत्येक लाभार्थ्याला दरमहा १५०० रुपयांचे अनुदान दिले जाते. राज्य शासनाच्या योजनांचा निधी दर महिन्याला नियमित येतो, मात्र गेल्या दोन वर्षांपासून केंद्र शासनाच्या योजनांचा निधी रखडला होता. लाभार्थ्यांना फक्त १३०० रुपयेच मिळत होते.

वयोवृद्ध, निराधार नागरिकांकडून सातत्याने या योजनेच्या निधीसाठी पाठपुरावा केला जात होता. अखेर मागील आठवड्यात केंद्र शासनाने आजवर रखडलेल्या सर्व योजनांची रक्कम राज्याकडे व राज्याने ती जिल्हा प्रशासनाकडे वर्ग केली आहे. ही रक्कम जिल्हा प्रशासनाने तालुक्याला वर्ग केली असून पुढील आठवड्यापासून ती लाभार्थ्यांच्या खात्यावर मिळायला सुरू होईल.

केंद्राच्या योजना : लाभार्थी संख्या : अनुदानाची रक्कम

  • इंदिरा गांधी वृद्धापकाळ : २२हजार ७५८ : ९ कोटी ३८ लाख ५६ हजार ६९०
  • इंदिरा गांधी विधवा योजना : ३ हजार २० : ७९ लाख ७८ हजार ५००
  • इंदिरा गांधी दिव्यांग योजना : १५० : १२ लाख ८१ हजार ५००

कुटुंब लाभ याेजनेचा १३७ जणांना लाभकेंद्र शासनाची कुटुंब लाभ ही योजना पूर्वीपासून चालत आलेली असली तरी त्याचा फारसा प्रचार-प्रसार झालेला नाही. या योजनेते कुटुंबातील कर्ती पुरुष किंवा महिलेचा मृत्यू झाला तर वारसांना एकरकमी २० हजार रुपयांचा लाभ दिला जातो. जिल्ह्यातील १३७ कुुटुंबांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. ही रक्कम २७ लाख ६० हजार इतकी आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCentral Governmentकेंद्र सरकारfundsनिधी