दरम्यान, ही घटना घडूनही ग्रामपंचायत प्रशासन आणि कोरोना सहनियंत्रण समितीने कोणतीच कारवाई केली नव्हती. याबाबत ‘लोकमत’मधून कोरोनाबाधित मृतदेहावर गर्दीत अंत्यसंस्कार हे वृत्त प्रसिद्ध होताच. आज प्रशासन जागे होऊन त्याच्याविरोधात हुपरी पोलिसांत तक्रार दिली.
पोलीस व घटनास्थळाहून मिळालेली माहिती अशी की, ग्रामपंचायत कार्यालयात रोजंदारीवर असणारा शिपाई महादेव धोंडिराम पोवार याने आपल्या भावाच्या कोरोनाबाधित जावयाच्या मृतदेहावर पट्टणकोडोली सार्वजनिक स्मशानभूमीमध्ये शुक्रवारी अंत्यसंस्कार केले होते. या अंत्यसंस्कारास ४५ जण उपस्थित होते. तर मृतदेहावरील प्लास्टिक फाडून मृतदेह उघडा केला होता. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार सावरतकर हे करीत आहेत.