शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

वेळेच्या नियोजनाने भविष्य उज्ज्वल

By admin | Published: April 16, 2017 12:46 AM

विश्वास नांगरे-पाटील : प्राथमिक शिक्षण शिष्यवृत्ती व क्रीडा स्पर्धा बक्षीस वितरण

कोल्हापूर : मोबाईल, इंटरनेट गेम यांमध्ये वेळ न घालविता विद्यार्थ्यांनी दिवसातील वेळेचे नियोजन केल्यास उद्याचे भविष्य उज्ज्वल होईल, असे मत विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी व्यक्त केले. महापालिका प्राथमिक शिक्षण समितीतर्फे संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह येथे शनिवारी सकाळी पूर्व उच्च प्राथमिक (इ. पाचवी स्तर) शिष्यवृत्ती व आंतरशालेय क्रीडा स्पर्धा बक्षीस समारंभप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महापौर हसिना फरास होत्या. नांगरे-पाटील म्हणाले, मोबाईल, इंटरनेट या साधनांमुळे आजची पिढी व्यसनाधीन होत आहे. हे आक्रमण थोपवायचे असेल तर दिवसातील तासांचे नियोजन करणे आवश्यक आहे. यासाठी आजपासूनच तासांचे नियोजन आवश्यक आहे. यात शून्य तास मोबाईल, दोन तास व्यायाम, दोन तासांमधून उत्साह वाढविण्यासाठी ग्रीन टी अर्थात चहा घेणे, काही तास मेंदूला विश्रांती द्यावी. दिवसातून पाच वेळा छोटे जेवण घ्यावे. आठ तास शांत झोप घ्यावी. किमान १० तास अभ्यास अर्थात कष्ट करावेत, असे नियोजन करा. पाचवी ते सातवीपर्यंत सर्वसाधारणपणे १० ते १३ वयोगट असतो. याच काळात मेंंदूच्या पुढच्या भागाचा विकास होत असतो. त्यातून पौगंडावस्था तयार होत असते. त्यामुळे या काळात चांगली पुस्तके वाचा. हेच ब्रेन टॉनिक आहे. पाचवी ते सातवी या काळातील बुद्धिमत्ता चाचणी हीच पुढे स्पर्धा परीक्षांकरिता उपयोगी ठरते. महापौर फरास म्हणाल्या, आई-वडील, गुरुजनांवर प्रेम करा. कर्तृत्ववान व्यक्तींच्या कार्याचा वसा घ्या. अभ्यास, खेळ यांतून जीवनात यशस्वी होण्यासाठी नियोजन करा. आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी महापालिका शाळांच्या पटसंख्या व गुणवत्ता वाढीच्या उपक्रमांना बळ देऊ, असे सांगितले. प्रभारी शिक्षणाधिकारी प्रतिभा सुर्वे यांनी प्रास्ताविक, तर शिक्षण समिती सभापती अजिंक्य चव्हाण यांनी स्वागत केले. यावेळी सहायक उपायुक्त सचिन खाडे यांच्यासह महापालिकेच्या सर्व शाळांमधील विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी शिष्यवृत्ती परीक्षेत पूर्व उच्च व पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत पैकीच्या पैकी गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांसह शिक्षकांचा सत्कार केला.यशस्वी विद्यार्थी असे (पूर्व उच्च प्र्राथमिक) वर्धन धनाजी माळी, प्रथमेश मलकारी आरगे, श्वेता सदानंद बाळेकुंद्र्री (तिघेही टेंबलाईवाडी विद्यामंदिर), अर्शद मुबारक नाकाडे, प्रथमेश राजीव जरग, आर्य राजाराम तळप (तिघेही लक्ष्मीबाई जरग विद्यामंदिर), संचिता सचिन पाटील, नरेंद्र्र संजय दाभोळकर (दोघे नेहरूनगर विद्यालय), हर्ष पुंडलिक खानापूरकर (ज्योतिर्लिंग विद्यामंदिर), वैभवी राजू सुतार (यशवंतराव चव्हाण विद्यामंदिर), तर महापालिकेचे महात्मा फुले विद्यामंदिर, फुलेवाडी (आंतरशालेय क्रीडा स्पर्धेत प्रथम), खासगी शाळांमध्ये जीवनकल्याण प्राथमिक शाळा, शुगर मिल यांचा समावेश होता.