कोल्हापूर : निर्माता दिग्दर्शक किरण शांताराम यांनी शुक्रवारी कलायोगी जी. कांबळे आर्ट गॅलरीला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी जी. कांबळे यांच्या कार्यकर्तृत्वाचा ठेवा जतन करून ठेवल्याबद्दल कांबळे परिवाराचे कौतुक केले.व्ही. शांताराम यांच्या जीवनावर आधारित नियोजित पुस्तकात वापरण्यासाठी जी. कांबळे यांनी राजकमल कलामंदिरच्या चित्रपटांसाठी तयार केलेल्या तत्कालीन पोस्टर्स व चित्रांची त्यांनी पाहणी केली. दहेज, डॉक्टर कोटनीसकी अमर कहानी, तुफान और दिया, हो आँखे बारा हाथ, माली या चित्रपटांचे पोस्टर्स, पोस्टर्स तयार करण्यापूर्वी त्यांनी बनविलेले स्केचेस पाहून ते भारावले.गॅलरीचे अध्यक्ष शांताराम कांबळे यांनी स्वागत केले. अशोक कांबळे यांनी गॅलरीतील चित्रांची माहिती दिली. यावेळी ज्योती किरण शांताराम, माजी नगरसेवक आर. डी. पाटील, अनघा पेंढारकर, दिलीप बापट, श्रीकांत डिग्रजकर, श्रीधर वैद्य, सुरेश साबळे, आदी उपस्थित होते. रियाज शेख यांनी प्रास्ताविक केले.