शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मण हाकेंचीही पंकजा मुंडेंना साथ; दसरा मेळाव्याला हजर राहण्याची घोषणा करत म्हणाले...
2
एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड, दोन तास प्रवाशांचा जीव टांगणीला, अखेर सुरक्षित लँडिंग
3
न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा; बुमराहला पुन्हा उप कॅप्टन्सीचा मान
4
MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; 'या' दोन परीक्षांबाबत आयोगाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय!
5
राजेगटाचं अखेर ठरलं! संजीवराजेंच्या नेतृत्वात तुतारी हाती घेणार; रामराजे नक्की काय करणार?
6
अभिनेते सयाजी शिंदे यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश, मिळाली मोठी जबाबदारी
7
"माझं केवळ त्याच्या पेन्शनवर प्रेम होतं’’, लव्ह ट्रँगलमधून ३५ वर्षाच्या प्रेयसीने वृद्धाची केली हत्या
8
१२० मिनिटांचा थरार, समोर होता मृत्यू, पण वैमानिकानं दाखवलं प्रसंगावधान, असं उतरवलं विमान 
9
ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटी मालिकेला रोहित शर्मा मुकणार? कर्णधार, सलामीवीरासाठी 'ही' नावं चर्चेत
10
महिलांसाठी दिलासादायक बातमी: 'लाडकी बहीण'साठी अर्ज करण्याची मुदत वाढवली, 'ही' असेल शेवटची तारीख!
11
तू ही जरियाँ.. तू ही मंजिल है...! 'अ‍ॅनिमल' फेम तृप्ती डिमरीच्या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा
12
पोटच्या मुलाला भेटण्यासाठी धडपडणाऱ्या आईची तिच्या पतीनेच भररत्यात गळा चिरून केली हत्या 
13
क्रिकेटच्या खेळातील ४ महत्त्वाच्या नियमांमध्ये बदल! नव्या हंगामापासून लागू होणार नवे नियम
14
बोपदेव घाट बलात्कार प्रकरण: पोलिसांनी आतापर्यंत किती आरोपींना अटक केलीये?
15
"उभे राहणार का", सयाजी शिंदेंना निवडणुकीबद्दल प्रश्न; अजित पवारांनी दिलं भारी उत्तर
16
७६०० कोटींच्या ड्रग्ज प्रकरणी ईडीची कारवाई, दिल्ली-मुंबईत छापेमारी, गुन्हा दाखल
17
"...म्हणून मी मंत्रिमंडळ बैठकीतून तडकाफडकी निघालो?", अजित पवार यांनी केलं स्पष्ट 
18
भारतीय जवानांचा जीव धोक्यात, इस्रायलच्या 'या' निर्णयावर भारताने व्यक्त केली चिंता; जाणून घ्या काय आहे धोका
19
सैनी सरकारचा १५ ऑक्टोबरला शपथविधी, PM मोदींसह भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार!
20
नोएडातील एमिटी युनिव्हर्सिटी परिसरात दोन गटांमध्ये गोळीबार, एक विद्यार्थी जखमी

गडहिंग्लज विभागात राष्ट्रवादीचाच वरचष्मा !

By admin | Published: September 18, 2015 9:26 PM

प्रमुख सत्ताकें द्रे काबीज : गडहिंग्लज बाजार समिती, आजरा साखर कारखाना, आजरा संघावर झेंडा

राम मगदूम -गडहिंग्लज--गडहिंग्लज बाजार समिती, आजरा साखर कारखाना, आजरा व गडहिंग्लज तालुका संघासह ९२ पैकी ४७ ग्रामपंचायतींची सत्ता मिळून गडहिंग्लज उपविभागात आपला वरचष्मा ठेवण्यात ‘राष्ट्रवादी’ला यश आले आहे. किंबहुना, गडहिंग्लज विभागातील प्रमुख सत्ताकेंद्रे काबीज करून आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी चंदगड विधानसभा मतदारसंघाच्या राजकारणात बाजी मारली आहे.स्व. बाबासाहेब कुपेकरांनी गडहिंग्लज बाजार समितीची गेल्यावेळची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी मोलाची भूमिका बजावली होती. मात्र, निवडणुकीनंतर पदाधिकारी निवडीत विरोधकांनी त्यांना बाजूला सारले होते. यावेळच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या वाटणीच्या चार जागा पुन्हा मिळविण्याबरोबरच आपले समर्थक जयवंतराव शिंपींना पहिल्याचवर्षी सभापतिपदी बसविण्यात संध्यादेवींनी यश मिळविले.गेल्या पाच वर्षांपासून आजरा साखर कारखाना राष्ट्रवादीच्याच ताब्यात आहे. मात्र, पदाधिकारी बदलातून ‘वेळोवेळी’ निर्माण झालेली नाराजी आणि केडीसीसीच्या निवडणुकीत अशोक चराटींना उमेदवारी नाकारल्यामुळे आजऱ्याच्या राजकारणातील समीकरणे बदलली आहेत.या पार्श्वभूमीवर आजरा कारखान्यावरील सत्ता अबाधित ठेवण्याचे आव्हान राष्ट्रवादीसमोर होते. मात्र, विरोधकांची सत्तांतराची व्यूहरचना भेदून आपले ज्येष्ठ कार्यकर्ते अल्बर्ट डिसोझा यांना कारखान्याच्या अध्यक्षपदी बसविण्यात संध्यादेवींनी यश मिळविले. आजरा तालुका खरेदी-विक्री संघदेखील अनेक वर्षांपासून राष्ट्रवादीच्याच ताब्यात आहे. संघाची सत्ता हिसकावून घेण्यासाठी सर्वपक्षीय आघाडीने जंग-जंग पछाडले. मात्र, संघ आपल्याच ताब्यात ठेवण्यात राष्ट्रवादीने यश मिळविले. त्याचप्रमाणे निवडणूक बिनविरोध झालेल्या गडहिंग्लज तालुका संघाच्या सत्तेतील भागीदारी कायम ठेवण्यातही संध्यादेवींनी यश मिळविले. गडहिंग्लज, आजरा व चंदगड तालुक्यांतील निवडणूक झालेल्या ९२ ग्रामपंचायतींपैकी ४७ ग्रामपंचायतींवर त्यांनी निर्विवादपणे राष्ट्रवादीचा झेंडा फडकविला. उर्वरित बहुतेक गावात स्थानिक आघाडीत सहभागी होऊन सत्तेत सहभाग मिळविला. ‘बेरजेचे राजकारण’ हेच स्व. कुपेकरांच्या ‘राजनिती’चे वैशिष्ट्य होते. त्याच ‘राजनिती’ने संध्यादेवींनीही गडहिंग्लज विभागातील राजकारणात आपला वरचष्मा राखला आहे.या संस्थांची मिळविली सत्ता --गडहिंग्लज बाजार समितीच्या सभापतिपदी आपले समर्थक जयवंतराव शिंपींना बसविले.आजरा साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कार्यकर्ते अल्बर्ट डिसोझा यांना बसविले.