गडहिंग्लज : चिंचेवाडी (ता. गडहिंग्लज) येथील संत गजानन महाराज इंजिनिअरिंग महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एच. सावंत यांची नवी दिल्लीच्या अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या (एआयसीटीई) मार्गदर्शकपदी निवड झाली. डॉ. सावंत यांना अध्यापन व प्रशासनाचा ३० हून अधिक वर्षांचा अनुभव आहे.
संस्था व महाविद्यालयांना ते एनबीए परिमाणाची पूर्तता करण्याविषयी मार्गदर्शन करतात. अभ्यासक्रम सुधारणा, संशोधन व तंत्रज्ञान विकास, अध्यापन तंत्र, विद्यार्थी समस्या निराकरण, प्रात्यक्षिक मूल्यांकनासाठी त्यांच्या मार्गदर्शनाचा उपयोग होणार आहे.
त्यांना संस्थाध्यक्ष अॅड. डॉ. अण्णासाहेब चव्हाण, डॉ. संजय चव्हाण, डॉ. यशवंत चव्हाण यांचे प्रोत्साहन लाभले.
* डॉ. एस. एच. सावंत : १९०३२०२१-गड-०१
२) पेरणोलीत गव्यांकडून उसाची नासाडी
पेरणोली : पेरणाली (ता. आजरा) येथील प्रभाकर देसाई यांच्या कासारशेत नावाच्या शेतपरिसरात गव्यांच्या कळपांनी धुमाकूळ घातला आहे. रात्रीच्यावेळी गव्यांच्या कळपाने खोडवा ऊस पिकाचे नुकसान केले आहे. वनरक्षक प्रतिभा पाटील यांनी नुकसानीची पाहणी करून पंचनामा केला आहे. जंगलांना लावण्यात येत असलेल्या आगी, पाणी व चाऱ्यांची कमतरता यामुळे गवे थेट गावच्या हद्दीत येत आहेत.
-------------------------
३) जनहित सेवा संस्थेच्या जिल्हाध्यक्षपदी रेडेकर
गडहिंग्लज : जनहित सेवा संस्था मानव हक्क व माहिती अधिकार संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी राजू रेडेकर (कुदनूर) यांची निवड करण्यात आली. कार्यकारिणीत - जिल्हा संपर्कप्रमुख अखलाकभाई मुजावर (महागाव), चंदगड तालुकाध्यक्ष - शंकर कोले (कालकुंद्री), गडहिंग्लज तालुका महिलाध्यक्षपदी मीनाक्षी जाधव (गडहिंग्लज), उपाध्यक्षपदी स्नेहलता साळुंखे, भारती कांबळे (चंदगड महिलाध्यक्षा), चित्रा शिंदे (जिल्हा सचिव), हणमंत निर्मळकर (माणगाव विभागप्रमुख), ताजुद्दीन सनदी (कुदनूर विभागप्रमुख) यांची निवड करण्यात आली.
-
-------
४) दाभिल येथील आगीत गवतगंज्या खाक
पेरणोली : दाभिल (ता. आजरा) येथील सातवान नावाच्या जंगल परिसरात लागलेल्या आगीत सुमारे २० एकर क्षेत्रातील काजूची झाडे, मेसकाठ्या व गवतगंज्या जळून खाक झाल्या. यामध्ये यशवंत राणे, पांडुरंग पाटील, तुकाराम राणे, तानाजी हासबे यांच्या गवतगंज्या जळाल्या.
-------------------------
५) कालकुंद्रीतील हरिनाम सप्ताह रद्द
गडहिंग्लज : कालकुंद्री (ता. चंदगड) येथे १९ ते २६ मार्चअखेर होणारा ग्रामदैवत श्री कलमेश्वरचा अखंड हरिनाम सप्ताह व महाप्रसादाचा कार्यक्रम यंदा कोरोनामुळे रद्द करण्यात आला आहे, अशी माहिती सप्ताह समितीने दिली आहे.
-
- ६) दिनकर मेटकर यांची निवड
गडहिंग्लज : नेसरी (ता. गडहिंग्लज) येथील दिनकर सुभाष मेटकर यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस गडहिंग्लज तालुका उपाध्यक्षपदी निवड झाली. निवडीचे पत्र शंभुराजे देसाई यांनी दिले.
------
७) आनंदा सुतार यांचा सत्कार
चंदगड : येथील दि न्यू इंग्लिश स्कूल व न. भु. पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचे वरिष्ठ लिपिक आनंदा सुतार यांचा सेवानिवृत्तीनिमित्त उद्योजक के. एस. माळवे यांच्याहस्ते भेटवस्तू देऊन सत्कार केला. अध्यक्षस्थानी व्ही. आर. बांदिवडेकर होते. प्राचार्य आर. आय. पाटील यांनी प्रास्ताविक केले. पर्यवेक्षक एस. जी. सातवणेकर यांनी आभार मानले.
--