हलकर्णी : हलकर्णी जिल्हा परिषदेच्या मतदार संघातील वयोवृद्ध, ज्येष्ठ व व्याधिग्रस्त नागरिकांनी कोरोना लस घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिह चव्हाण यांनी केले. हलकर्णी येथे कोरोना लसीकरणासंदर्भात अधिकारी व पदाधिकारी यांच्या बैठकीत ते बोलत होते.
सरपंच, पोलीसपाटील व ग्रामसेवकांनी याकडे गांभीर्याने पहावे. लसीची सुरक्षितता नागरिकांना पटवून द्यावी व लसीकरणाचा वेग वाढवावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
यावेळी जिल्हा परिषदेच्या सदस्या रेखा हत्तरकी, तहसीलदार दिनेश पारगे, गटविकास अधिकारी शरद मगर यांच्यासह सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवक उपस्थित होते.
'त्या' धोकादायक गटारीची दुरुस्ती
हलकर्णी (ता. गडहिंग्लज) येथील पानारी गल्लीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील गटारीची दुरुस्ती करण्यात आली. रस्त्यावरील आडव्या गटारीची पाईप फुटून येथे मोठा खड्डा पडला होता. त्यामुळे हा रस्ता धोकादायक बनला होता.
'ओंकार'मध्ये ऑनलाईन स्पर्धा
गडहिंग्लज : येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात ऑनलाईन रांगोळी स्पर्धा पार पडली. स्पर्धेत ज्योती देवेकर, कांचनमाला मोरे, सुप्रिया कांबळे यांनी यश मिळविले. प्रा. डॉ. गंगासागर चोले यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.