गडहिंग्लजमध्ये शिवसेनेची गांधीगिरी
गडहिंग्लज : कोरोनाचा संसर्ग वाढत असतानाही बहुतांशी लोक मास्क वापरत आहेत. त्यामुळे शिवसैनिकांनी गडहिंग्लज शहरात विना मास्क फिरणा-यांना गुलाबपुष्प देऊन गांधीगिरी केली.
पोलिसांच्या मदतीने गडहिंग्लज नगरपालिका विनामास्क फिरणा-यांवर दंडात्मक कारवाईची मोहीम राबवत आहे. तरीदेखील अनेकजण बेफिकीरपणे सार्वजनिक ठिकाणी विना मास्क वावरत आहेत.
या पार्श्वभूमीवर नागरिकांनी गांभीर्याने मास्क व कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करावे यासाठी शिवसेनेतर्फे हा अनोखा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख सुनील शिंत्रे, संग्रामसिंह कुपेकर, तालुकाप्रमुख दिलीप माने, अशोक खोत, काशिनाथ गडकरी, अवधूत पाटील, सुरेश हेब्बाळे आदी उपस्थित होते.
-
--------------
२..
प्रियदर्शिनी महिला बँकेची
वार्षिक साधारण सभा उत्साहात
गडहिंग्लज : येथील दि प्रियदर्शिनी महिला सहकारी बँकेची २७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात पार पडली. अध्यक्षस्थानी संस्थापक राजन पेडणेकर होते. प्रांताधिकारी विजया पांगारकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी लिंगनूर कनुलच्या नूतन सरपंच ॲड. परमेश्वरी करगुप्पी, डॉ. संजीवनी पाटील यांच्यासह ज्येष्ठ नागरिक व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. व्यवस्थापक कल्पना तोडकर यांनी अहवाल वाचन केले.
सुमन पोतदार यांनी स्वागत केले. संस्थेच्या अध्यक्षा रेखा शिवारे यांनी प्रास्ताविक केले. स्नेहलता देशपांडे यांनी अतिथी परिचय करून दिला. संजीवनी पाटील यांनी सूत्रसंचलन केले. द्राक्षायणी घुगरी यांनी आभार मानले.
---
३.
बड्याचीवाडीत पोषण पंधरवड्याचे उद्घाटन
गडहिंग्लज : बड्याचीवाडी (ता. गडहिंग्लज) येथील अंगणवाडीमध्ये सहाय्यक गटविकास अधिकारी आनंद गजगेश्वर यांच्या हस्ते पोषण पंधरवड्याचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी गटशिक्षणाधिकारी नवलकुमार हिलबागोळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी गजगेश्वर यांनी पोषण पंधरवड्यात राबविल्या जाणा-य विविध उपक्रमांच्या माहितीसह कुपोषणमुक्त अंगणवाडीविषयी मार्गदर्शन केले.
अंगणवाडी सेविका वंदना साबळे यांनी स्वागत केले. एकात्मिक बालविकासच्या पर्यवेक्षिका के.एस. पाटील यांनी प्रास्ताविक केले. भक्ती येसरे यांनी आभार मानले.
-----