गडहिंग्लज : गडहिंग्लज शहरात सोमवारी (दि. १९) सकाळी १० ते सायंकाळी ६ पर्यंत वीजपुरवठा खंडित राहणार आहे. त्यामुळे शहरातील पाणीपुरवठादेखील त्यादिवशी बंद राहणार आहे, अशी माहिती नगरपालिका प्रशासनाने दिली आहे.
तथापि, वीजपुरवठा सुरळीत झाल्यानंतर पाणीपुरवठा पूर्ववत चालू करण्यात येईल, याची नागरिकांनी नोंद घेऊन प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
--------
बातमी -२
गडहिंग्लजमध्ये प्रशासनाला
नागरिकांचे उत्स्फूर्त सहकार्य
गडहिंग्लज : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनला गडहिंग्लजकरांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करत शहरातील नागरिकांनी घरी राहणे पसंत केले आहे. अत्यावश्यक सेवेतील सर्व व्यवहार सुरू आहेत; परंतु विनाकारण बाहेर फिरण्यावर नागरिकांनी स्वत:हून बंधन घालून घेतल्याचे चित्र शहरात पहायला मिळत आहे.
अगदी महत्त्वाच्या कामानिमित्त आणि भाजीपाला, औषधे, दूध व किराणा अशा कारणांसाठीही बाहेर पडणाऱ्यांची वर्दळ तुरळक आहे. शहरातील किराणा, भाजीपाला व अन्य अत्यावश्यक सेवेतील व्यावसायिकांनीही सायंकाळी ५ नंतर दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय स्वत:हून घेतला आहे.
विनाकारण बाहेर पडणारे लोक आणि विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी शहरातील दसरा चौक, बसवेश्वर पुतळा, कडगाव रोडवर बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.