गडहिंग्लज : गडहिंग्लज तालुका सरकारी व निमसरकारी पेन्शनर्स वेल्फेअर संस्थेतर्फे रविवारी (दि. २७) सकाळी ११ ते १२ या वेळेत माध्यमिक शिक्षण पतसंस्थेच्या सभागृहात पेन्शनर्स डे साजरा होणार आहे. दुपारी १ वाजता वार्षिक सभा व नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात येणार आहे.
---------------------
२) संजय खोचरे तृतीय
उत्तूर : सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्याचे अध्यक्ष नविद मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय खुल्या वक्तृत्व स्पर्धेत उत्तूर महाविद्यालयाचे शिक्षक संजय खोचरे यांच्या ‘‘शेतकरी राजा दशा आणि दिशा’’ या विषयावरील वक्तृत्वला तृतीय क्रमांक मिळाला. त्यांना अनंतराव आजगावकर यांचे मार्गदर्शन लाभले.
---------------------
३) राजगोळीत शारीरिक, बौद्धिक चाचणी स्पर्धा
चंदगड : राजगोळी बुद्रुक येथील तरुणांतर्फे रविवारी (दि. १३) सकाळी ७ वाजता छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर शारीरिक व बौद्धिक चाचणी स्पर्धा आयोजित केली आहे. येत्या काही दिवसांत होणाऱ्या सैन्यभरतीचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून १७ ते २३ वयोगट असणाऱ्यांसाठी धावणे, १० व २० पुलअप्स मारणे, आदी शारीरिक व बौद्धिक चाचणी घेण्यात येणार आहे.
---------------------
४) गडहिंग्लजमध्ये शनिवारी रक्तदान शिबिर
गडहिंग्लज : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी (दि. १२) गडहिंग्लज शहर व तालुका राष्ट्रवादीतर्फे रक्तदान शिबिर आयोजित केले आहे. कडगाव रोडवरील राष्ट्रवादी कार्यालयात हे शिबिर होईल, अशी माहिती रामाप्पा करिगार यांनी दिली.
-
--------------------
५) कालकुंद्रीचा सुमित धावणेत तृतीय
चंदगड : कालकुंद्री येथील सरस्वती विद्यालयाचा धावपटू सुमित बंडू पाटील याने करगणी (सांगली) येथे झालेल्या राज्यस्तरीय तिरंगा मॅरेथॉन स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकाविला.