गडहिंग्लज : बड्याचीवाडी (ता. गडहिंग्लज) येथे ग्रामपंचायतीतर्फे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बैठक घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या. सरपंच सतीश कोळेकर अध्यक्षस्थानी होते.
यावेळी आशा वर्कर, अंगणवाडी सेविकांना गावात व रानभाग वस्तीत सर्व्हे करण्याची सूचना देण्यात आली. त्यासाठी नेमलेल्या पथकाला ऑक्सिमीटर व थर्मल स्कॅनरचे वाटप करण्यात आले. गावातील सर्व रस्ते व गल्लींमध्ये सेमियम हायफोक्लोराईटची फवारणी करून निर्जंतुकीकरण करण्यात आले.
बैठकीस उपसरपंच सुनीता दळवी, विश्वास खोत, सविता राक्षे, मारुती राक्षे, ग्रामसेवक संदीप तोरस्कर, तलाठी अजयसिंह किल्लेदार, आरोग्य सेवक अमोल सरंजामे आदी उपस्थित होते.
२) गडहिंग्लजला शिवजयंती साजरी
गडहिंग्लज : गडहिंग्लजमध्ये मराठा समाजातर्फे शिवजयंती साजरी करण्यात आली. शहरातील दसरा चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला माजी नगराध्यक्षा वसंतराव यमगेकर, बाळासाहेब घुगरे यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी मराठा मंडळाचे अध्यक्ष किरण कदम, मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष आप्पा शिवणे, मनसेचे नागेश चौगुले, संजय पाटील, युवराज बरगे, किरण डोमणे, पांडुरंग पाटील, सचिन पाटील, राजू माने आदी उपस्थित होते.
३) कौलगेत बसवेश्वर मंडळातर्फे साहित्य वाटप
गडहिंग्लज : कौलगे (ता. गडहिंग्लज) येथील बसवेश्वर तरुण मंडळार्फे कोरोना संसर्ग रोखण्यासाठी गावातील अत्यावश्यक सेवा देणाऱ्या व्यक्तींना बुस्टर डोस, सॅनिटायझर व मास्कचे वाटप करण्यात आले. ३५० लोकांना साहित्य देण्यात आले.
ग्रामपंचायत कर्मचारी, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी, औषध दुकानदार तसेच दूध व पतसंस्थेतील कर्मचाऱ्यांना मास्क व सॅनिटायझर पुरविण्यात आले.
याकामी दत्ता मडकर, राहुल पाटील, मच्छिंद्र पाटील, तेजस देसाई, शरद देसाई, रोहित पाटील, सखाराम पाटील, शुभम देसाई यांनी परिश्रम घेतले.