१) गडहिंग्लजमध्ये ७०० शेणी दान
गडहिंग्लज : कोरोनामुळे मृत पावणाऱ्या व्यक्तींवर अंत्यसंस्कारासाठी लागणाऱ्या शेणी व लाकडाची कमतरता पडत आहे. पालिकेच्या केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत येथील अंबिका महिला मंडळातर्फे सामाजिक बांधीलकीतून मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमीसाठी ७०० शेणी दान केल्या. आरोग्य निरीक्षक प्रकाश राठोड यांच्याकडे या शेणी दिल्या. यावेळी रंजना पाटील, उज्ज्वला दळवी, सुकांती सुतार, उर्मिला कदम, अरुणा रेडेकर, सुशीला पाटील आदी उपस्थित होते.
--
२) हरळी ग्रामस्थांकडून १० टन लाकूड
गडहिंग्लज : हरळी (ता. गडहिंग्लज) ग्रामपंचायतीने गडहिंग्लज पालिकेतर्फे कोविड मृतांवर करण्यात येणाऱ्या अंत्यसंस्कारासाठी लागणाऱ्या लाकूड, शेणी आदी साहित्यासाठी मदतीचे आवाहन केले होते. त्यास प्रतिसाद देत ग्रामस्थांनी १० टन लाकूड व दोन ट्रॉली शेणींची मदत देण्यात आली.
याकामी सरपंच उर्मिला पाटील, अरुण पाटील, रामदास पाटील, निकेत नाईक, ग्रामसेवक टी. वाय. हनुमंते यांच्यासह ग्रा. पं. पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
----
३) क्रास्ट्राईबच्या अध्यक्षपदी बागी
गडहिंग्लज : क्रास्ट्राईब कर्मचारी संघटनेच्या गडहिंग्लज तालुकाध्यक्षपदी सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षिका प्रभावती बागी यांची निवड करण्यात आली. मुख्य सचिव निंगाप्पा बारामती यांनी त्यांना नियुक्ती पत्र दिले.