सिंगलसाठी
१) चंदगड-गडहिंग्लज आजपासून बससेवा
गडहिंग्लज : चंदगड आगाराने चंदगड-गडहिंग्लज मार्गावर गुरुवार (दि.३) पासून बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. चंदगडवरून सकाळी ८ वाजता व दुपारी साडेतीन वाजता बस गडहिंग्लजला सुटेल. गडहिंग्लजहून सकाळी १० व सायंकाळी ५.३० वाजता चंदगडला सुटणार आहे, याची प्रवाशांनी नोंद घ्यावी, असे आवाहन आगाराने केले आहे.
---
२) बिद्रेवाडीत कूपनलिकेची खुदाई
नेसरी : बिद्रेवाडी (ता. गडहिंग्लज) येथे जि. प. सदस्य अॅड. हेमंत कोलेकर यांच्या फंडातून दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत २०० फूट कूपनलिकेची खुदाई करण्यात आली. या वेळी सरपंच भरमू जाधव, उपसरपंच राजेंद्र नाईक, ग्रा. पं. सदस्य दत्तात्रय गुरव, रूपाली नाईक, सुरेश कांबळे, श्रावण पाटील, प्रवीण कांबळे आदी उपस्थित होते.
--
३) अडकूरमध्ये खांब बदलण्याची मागणी
गडहिंग्लज : अडकूर (ता. चंदगड) येथील शिवाजी चौकात रस्त्याच्या मधे असणारा विद्युत खांब हटवून अन्यत्र उभा करावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. ज्या परिसरात खांब आहे, त्या परिसरात प्राथमिक आरोग्य केंद्र, विकास सेवा संस्था, ग्रामपंचायत व विविध सहकारी पतसंस्थांची कार्यालये आहेत. त्यामुळे या परिसरात नेहमी वर्दळ असते. मात्र, रस्त्यातच खांब असल्याने अनेकदा वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.
दरम्यान, सध्या या परिसरात आमदार राजेश पाटील यांच्या प्रयत्नाने मंजूर निधीतून रस्त्याचे डांबरीकरण सुरू आहे. त्यामुळे खांब हटवून रस्त्याच्या एका कडेला उभा करावा.
४) महागावमध्ये पाणी व सॅनिटायझरचे वितरण
गडहिंग्लज : महागाव (ता. गडहिंग्लज) येथील अप्पी पाटील युवा मंचतर्फे कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आणि कोरोनाबाधित क्षेत्राचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी गावभर सॅनिटायझरची फवारणी करण्यात आली.
दरम्यान, वादळी पावसामुळे गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावातील पाणी गढूळ झाले आहे. त्यामुळे कोरोनाचा साखळी तोडणे व अन्य साथीचे आजार नागरिकांना होऊ नयेत म्हणून गेली ५ दिवस १० टँकरद्वारे पिण्याचे स्वच्छ पाणी नागरिकांना पुरविण्यात येत आहे, असे मंचचे अध्यक्ष श्रीशैल पाटील यांनी सांगितले.
-------------------
----
५) जरळीत शाळा परिसराची स्वच्छता
गडहिंग्लज : जरळी (ता. गडहिंग्लज) येथे कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी कोरोनासदृश लक्षणे असणाऱ्या व बाहेरून येणाऱ्यांना ग्रामपंचायतीने प्राथमिक शाळेत संस्थात्मक अलगीकरण करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून शाळा बंद असल्याने शाळा परिसरात झाडे-झुडपे व अस्वच्छता निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य लक्षात घेऊन खुद्द ग्रामपंचायत सदस्यांनीच शाळा परिसराची स्वच्छता करून घेतली.
याकामी सरपंच सागर पाटील, उपसरपंच शिवाजी बागडी, काकासाहेब दुंडगे, रवींद्र दुंडगे, भिमगोंडा पाटील, मारुती नाईक, सुनील चोथे, आकाश चव्हाण यांनी परिश्रम घेतले.
-----------------------
६) आजऱ्यात शिवसैनिकांकडून मदत
गडहिंग्लज : आजरा येथील शिवसैनिकांनी सामाजिक बांधिलकीतून जमा केलेली रक्कम कोरोना योद्धा प्रवीण तिप्पट यांच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द केली. तिप्पट यांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जमा झालेली ही रक्कम तिप्पट यांच्या पत्नी व मुलगी गौरी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.
या वेळी शिवसेना शहरप्रमुख आेंकार माद्याळकर, महेश पाटील, स्वप्निल शिवणे, सागर नाईक, अनपाल तकिलदार, भिकाजी विभुते, यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.