गडहिंग्लज : येथील बसस्थानकात महिला व युवतींच्या संरक्षणार्थ उभारण्यात आलेल्या जनजागृती फलकाचे अनावरण नगराध्यक्षा प्रा. स्वाती कोरी व उपनगराध्यक्ष महेश कोरी यांच्या हस्ते झाले. निर्भया पथकप्रमुख सहायक पोलीस निरीक्षक स्वाती सूर्यवंशी यांनी उपक्रमाबाबत माहिती दिली. युवती व महिलांना दिला जात असेल तर थेट निर्भया पथकाशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी तानाजी पाटील, बाबासाहेब सावंत, धनश्री सावंत आदींसह महिला उपस्थित होत्या.
- २) जखेवाडीत आज उत्सव
गडहिंग्लज : जखेवाडी येथे उद्या (शुक्रवारी) मुक्तानंद महाराज यांचा २० वा पुण्यस्मरण उत्सव होत आहे. त्यानिमित्त सकाळी ८ ते ९.३० या कालावधीत समाधी अभिषेक होईल. त्यानंतर मुक्तानंद महाराजांच्या प्रतिमेची मिरवणूक व दुपारी प्रवचन, गुलाल व पुष्पवृष्टी होईल.
३) माणगावची यात्रा रद्द
कोवाड : माणगाव (ता. चंदगड) येथे ४ मार्चला होणारी सीमदेव यात्रा कोरोनामुळे रद्द करण्यात आली आहे. केवळ मानकरी व गुरव यांच्या उपस्थितीत धार्मिक विधी, पूजा-अर्चा होणार आहे, असे आवाहन ग्रामपंचायतीने केले आहे.
---------------------------------------------- ४) गडहिंग्लजमध्ये शनिवारी पुस्तक प्रकाशन
गडहिंग्लज : येथील विद्या प्रसारक मंडळातर्फे शनिवारी (२७) कै. रावसाहेबअण्णा कित्तूरकर यांच्या जीवनचरित्रावर आधारित ‘श्रीमंत राजयोगी’ या पुस्तकाचे प्रकाशन ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते होईल. निडसोशी मठाचे मठाधिपती श्री. शिवलिंगेश्वर महास्वामीजी यांच्या प्रमुख उपस्थितीत राहणार आहे. रत्नमाला घाळी अध्यक्षस्थान भूषवतील. ---------------------------------------------- ५) अडकूर परिसरात उसावर तांबेरा
चंदगड : बदलत्या हवामानामुळे अडकूर परिसरात उसावर तांबेरा राेगाचा प्रादुर्भाव वाढत आहे. तथापि, परिसरातील ९० टक्के उसाची तोड झाली आहे. त्यामुळे सुरुवातीस तुटून गेलेल्या ऊस पिकावर तांबेरा दिसून येत आहे. रासायनिक खताऐवजी सेंद्रिय खतांचा वापर करावा, असे आवाहन कृषी सहायक प्रल्हाद केंद्रे यांनी केले आहे.
- ६) सातवणेतील धोकादायक वळण हटवा
चंदगड : सातवणे येथील बस थांबा ते दत्त मंदिर या ५०० मीटरचा वळणधारक रस्ता पूर्णता धोकादायक आहे. सातवणे-नागनवाडी या राज्य मार्गावर असणारे हे धोकादायक वळण बांधकाम विभागाने हटवावे, अशी मागणी प्रवासी व वाहनधारकांतून होत आहे.
७) देवर्डेच्या पतसंस्थेला साडेतीन लाखांचा नफा
पेरणोली : देवर्डे (ता. आजरा) येथील म. गांधी सेवा संस्थेला आर्थिक वर्षात ३ लाख ६१ हजार ७३५ रुपयांचा नफा झाला आहे, अशी माहिती अध्यक्ष शशिकांत पाटकर यांनी वार्षिक सभेत दिली.
यावेळी सभासदांना ६ टक्के लाभांश, ६ टक्के व्याज व संस्था कर्मचाऱ्यांना २० टक्के बोनस देण्याचा निर्णय झाला. महादेव गुरव यांनी आर्थिक पत्रकांचे वाचन केले.
यावेळी रामचंद्र शेटगे, धोंडिबा पाटील, मनोहर करेकर, सूर्यकांत पाटील, शंकर गुरव आदींसह सभासद उपस्थित होते.