गडहिंग्लज : शहरातील व्याधीग्रस्त व ज्येष्ठ नागरिकांच्या ऑनलाईन नावनोंदणीसाठी नगरपालिकेतर्फे कोविड लसीकरण मदत कक्ष सुरू करण्यात आला आहे. शहरातील बॅ. नाथ पै विद्यालयाच्या जनता खुले नाट्यगृहालगतच्या खोलीत दररोज सकाळी १० ते सायंकाळी ५ पर्यंत नोंदणीसाठी कक्ष खुला राहणार आहे. ६० वर्षांवरील आणि ४५ वर्षांवरील व्याधीग्रस्त नागरिकांना लस देण्यात येत आहे; परंतु, त्यासाठी ऑनलाईन नोंदणी करण्याची माहिती नागरिकांना नसल्याने होणारी अडचण लक्षात घेऊन पालिकेने हा कक्ष सुरू केला आहे. यावेळी उपनगराध्यक्ष महेश कोरी, नगरसेवक नरेंद्र भद्रापूर, मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर आदींसह नागरिक उपस्थित होते.
---------
बातमी -३
गडहिंग्लज हायस्कूलमध्ये मोफत आरोग्य शिबीर
गडहिंग्लज : गडहिंग्लज हायस्कूलमध्ये उद्योजक प्रवीण पाटील यांच्या सहकार्याने मोफत आरोग्य शिबिर पार पडले. प्रांताधिकारी विजया पांगारकर यांच्याहस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी वीरपत्नी वृषाली तोरस्कर, माजी सैनिक कुमार पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मल्लिकार्जुन अथणी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक एस. एन. देसाई, व्ही. आर. पालेकर, पी. टी. पाटील आदी उपस्थित होते.