१) गडहिंग्लजमध्ये मंगळवारी चर्चासत्र
गडहिंग्लज : येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात मंगळवार (१६) सकाळी १०.३० ते दुपारी १.३० या वेळेत 'कोविड - १९ व सामाजिक शास्त्रातील बदलते आयाम' या विषयावर झूम माध्यमाद्वारे ऑनलाईन चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. चर्चासत्रात 'सुयेक'चे अध्यक्ष डॉ. अनिलकुमार वावरे, प्रा. डॉ. देविदास वायदंडे, डॉ. प्रभाकर कोळेकर मार्गदर्शन करणार आहेत.
-------------------------
२) रेडेकर रुग्णालयात लसीकरणास प्रारंभ
गडहिंग्लज : येथील केदारी रेडेकर धर्मादाय रुग्णालयात शासन निर्देशानुसार कोरोना लसीकरणास प्रारंभ झाला. ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व ४५ ते ५९ वर्षांपर्यंतच्या नागरिकांसाठी हे लसीकरण सुरू असून व्याधीग्रस्त नागरिकांनी संबंधित डॉक्टरांकडून वैद्यकीय दाखला आणणे आवश्यक आहे. प्रती डोस २५० रुपये असून, नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थाध्यक्षा अंजना रेडेकर यांनी केले आहे.
--------------------------
३) हेब्बाळमध्ये पदाधिकाऱ्यांचा सत्कार
गडहिंग्लज : हेब्बाळ क।। नूल येथे सर्व सेवानिवृत्त संघटनेतर्फे ग्रामपंचायत नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी भीमसिंग शिलेदार होते. यावेळी नूतन सरपंच, उपसरपंच, सदस्य आणि शिष्यवृत्तीधारक संकेत शिरगावे यांचाही सत्कार केला. एम. जी. चव्हाण, ए. आर. मिरजे, शिवाजी गवळी, सिद्धाप्पा कल्याणी, मल्लिकार्जुन मठदेवरू, वीरगोंडा पाटील, अशोक शिंदे आदी उपस्थित होते.
--------------------------