गडहिंग्लज : गडहिंग्लज, आजरा व चंदगड तालुक्यातील सर्व कोरोना मृतांवर गडहिंग्लज येथील स्मशानभूमीतच अंत्यसंस्कार केले जात आहेत.त्यामुळे नगरपालिकेवर मोठा भार पडत आहे. त्यामुळे नगरोत्थान योजनेतून गडहिंग्लजच्या स्मशानभूमीत विद्युत दाहिनी बसविण्यात येईल,अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी शनिवारी दिली.गडहिंग्लज उपविभागातील कोरोना आढावा बैठकीत ते बोलत होते.यावेळी आमदार राजेश पाटील हेही उपस्थित होते. गडहिंग्लज तालुक्याचा कोरोना पॉझिटिव्हिटीचा दर जिल्ह्यापेक्षा अधिक असल्यामुळे संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी खबरदारी घ्यावी,असे आवाहन त्यांनी केले.मुश्रीफ म्हणाले,गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयातील बेडची संख्या २०० करण्यास मंजुरी मिळाली आहे.तसेच रूग्णालयात दुसरा ऑक्सीजन प्लाण्ट व सीटी स्कॅन मशिनचीही सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे.चंदगड व आजरा ग्रामीण रुग्णालयातील बेडची संख्यादेखील ३० वरून ५० करण्यात येणार आहे.तसेच तिन्ही तालुक्यात लहान मुलांसाठी काही बेड राखीव ठेवण्यात येणार आहेत, असे ही त्यांनी सांगितले.यावेळी पोलीस उपअधीक्षक गणेश इंगळे, प्रांताधिकारी विजया पांगारकर, तहसीलदार दिनेश पारगे, गटविकास अधिकारी शरद मगर,मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.दिलीप आंबोळे, डॉ.अथणी,अभय देसाई उपस्थित होते.मोदी, ममतादीदींचे मानले आभार..!|पश्र्चिम बंगालमध्ये १८ वर्षांवरील नागरिकांच्या मोफत लसीकरणाचा निर्णय घेतल्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी लसीकरणाच्या प्रमाणपत्रावर आपला फोटो छापला.म्हणूनच केंद्रालाही देशातील १८ वर्षांवरील सर्व नागरिकांच्या लसीकरणाची जबाबदारी घ्यावी लागली.त्यामुळे पंतप्रधान मोदी व ममतादीदी यांचे आणि केंद्र व राज्यांच्या लसीकरणासंदर्भातील वादात हस्तक्षेप केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाचेही मी आभार मानतो, अशी टिप्पणीही मुश्रीफ यांनी केली.
गडहिंग्लजच्या स्मशानभूमीत विद्युत दाहिनी बसवणार : हसन मुश्रीफ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2021 11:08 AM
CoronaVirus In Kolhapur : गडहिंग्लज, आजरा व चंदगड तालुक्यातील सर्व कोरोना मृतांवर गडहिंग्लज येथील स्मशानभूमीतच अंत्यसंस्कार केले जात आहेत.त्यामुळे नगरपालिकेवर मोठा भार पडत आहे. त्यामुळे नगरोत्थान योजनेतून गडहिंग्लजच्या स्मशानभूमीत विद्युत दाहिनी बसविण्यात येईल,अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी शनिवारी दिली.
ठळक मुद्देगडहिंग्लजच्या स्मशानभूमीत विद्युत दाहिनी बसवणार : हसन मुश्रीफ कोरोना आढावा बैठकीत माहिती,तिसऱ्या लाटेची खबरदारी घेण्याचे आवाहन