कोरी म्हणाल्या, ९ मार्च २०१९ रोजी गडहिंग्लज शहराच्या हद्दवाढीला मंजुरी मिळाली आहे. त्यानुसार हद्दवाढ क्षेत्रातील नागरिकांना पायाभूत व मूलभूत नागरी सुविधा पुरविण्याची गरज आहे. त्यासाठी ही पाहणी सुरू झाली आहे.
वाढीव क्षेत्राच्या सुसंगत विकासासाठी भौगोलिक माहिती प्रणालीद्वारे विकास योजना तयार करण्याचे काम पालिकेने हाती घेतले आहे. त्यासाठी शासनाने एका खासगी कंपनीची नियुक्ती केली आहे.
दोन पथकाकडून ड्रोनद्वारे पाहणीचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे वाढीव क्षेत्रातील विकासाची व बांधकामांची माहिती मिळणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाहणीच्या कामासाठी अधिका-यांना सहकार्य करावे, असे त्यांनी केले आहे.
यावेळी मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर, नगररचनाकार श्रीकांत गीते उपस्थित होते.
फोटो ओळी : गडहिंग्लज शहरातील हद्दवाढ क्षेत्रातील विकास योजनेसाठी ड्रोनद्वारे पाहणीचे काम मंगळवारपासून सुरू झाले. यावेळी पाहणी पथकातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
क्रमांक : २२०६२०२१-गड-०८