गडहिंग्लज : येथील न्यू होराईझन स्लकूचा विश्वराज चव्हाण याने डॉ. होमीभाभा बालवैज्ञानिक टॅलेंट सर्च रिसर्च मुंबई यांच्यातर्फे आयोजित स्पर्धेत रौप्यपदक पटकाविले. त्याचा संस्था सचिव अॅड. बी. जी. भोसकी, सहसचिव गजेंद्र बंदी यांच्याहस्ते सत्कार झाला. त्याला मुख्याध्यापिका सुनीता पाटील, श्रीधर पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
--------------------
२) 'ओंकार' महाविद्यालयात मार्गदर्शन
गडहिंग्लज : शहरातील ओंकार शिक्षण संस्थेच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात 'आॅनलाईन परीक्षेचे स्वरूप व त्याबाबत विद्यार्थ्यांची भूमिका' याविषयावर कार्यशाळा झाली. अनिल पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी प्र. प्राचार्य डॉ. सुरेश चव्हाण, ज्ञानराजा चिघळीकर, समीर कुलकर्णी, प्रतिभा दुंडगे आदी उपस्थित होते.
------------------------
३) गडहिंग्लजमध्ये 'शाहूं'विषयी व्याख्यान
गडहिंग्लज : येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात 'राजर्षी शाहू महाराज यांचे क्रांतिसूर्य'????? याविषयावर आॅनलाईन व्याख्यान झाले. कार्यशाळेत ६७ जणांनी भाग घेतला.
डॉ. श्रीमंत कोकाटे यांनी शाहू महाराजांचे क्रांतिकारक कार्य, कृतिशील विचार, व्यसनाला विरोध, स्त्रियांचा सन्मान, माणुसकीची वागणूक हे ठळक मुद्यांवर विचार व्यक्त केले. यावेळी पुरुषोत्तम खेडेकर, डी. एस. क्षीरसागर, संजीवनी पाटील, समीर कुलकर्णी, शर्मिला घाटगे आदी उपस्थित होते.
---------------------
४) गडहिंग्लजमध्ये पदाधिका-यांचा सत्कार
गडहिंग्लज : येथील ओंकार महाविद्यालयातर्फे मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर व राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष रामगोंडा पाटील यांचा सत्कार झाला. यावेही प्र. प्राचार्य सुरेश चव्हाण, शर्मिला घाटगे, अनिल पाटील, काशिनाथ तनंगे आदी उपस्थित होते.