शहरं
Join us  
Trending Stories
1
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
2
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
3
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
4
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
5
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
6
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
7
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
8
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
9
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
10
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
11
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
12
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
13
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
14
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
15
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
16
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
17
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
18
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
19
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ

गडहिंग्लज कारखाना चालवून दाखवावा, श्रीपतराव शिंदेंचे प्रशासकांना आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2022 11:47 AM

उच्च न्यायालयाने स्थगिती मागे घेतल्याने कारखान्यावर प्रशासक मंडळाची नियुक्ती कायम झाली

गडहिंग्लज : आम्ही आजअखेर कारखाना चालविला, अजूनही कार्यक्षेत्रात ऊस शिल्लक आहे. प्रशासकांचे आम्ही स्वागत करतो. प्रशासकांनी आणि त्यांना आणण्यासाठी प्रयत्न केलेल्यांनी कारखाना चालवून दाखवावा. ऊसाची आणि तोडणी-वाहतुकीची बिले न दिल्यास प्रशासकांना कारभार करणे कठीण जाईल, असा इशारा आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज  तालुका सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष श्रीपतराव शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिला.बुधवारी (२३) उच्च न्यायालयाने स्थगिती मागे घेतल्याने प्रशासक मंडळाची नियुक्ती कायम झाली. या पार्श्वभूमीवर त्यांनी चालू हंगामातील गळीताचा लेखाजोखा मांडण्याबरोबरच विरोधकांवर जोरदार हल्लाबोलही केला. त्या १२ संचालकांनी शेतकऱ्याचा घात केला आहे त्यांच्यापासून सभासदांनी सावध रहावे असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी संचालक अमर चव्हाण, संभाजी नाईक व बाळकृष्ण परीट यांची उपस्थिती होती.शिंदे म्हणाले, कारखाना बंद पाडण्याचे षड्:यंत्र होते. त्यासाठीच कर्जपुरवठ्यात अडथळे आणण्यात आले. त्यामुळे ठेवी गोळा करून कारखाना सुरू केला. त्यानंतर ऊसाची बिले देण्यासाठी राज्य बँकेसह केडीसीकडे साखर तारण कर्ज मागितले, तेदेखील मिळाले नाही.अमर चव्हाण म्हणाले, कारखान्याच्या कर्जाचा बोजा आपल्या सात-बाºयावर नको म्हणणाºयांनीच प्रशासक आणला. बॉयलरमध्ये घातपात घडवून कारखाना बंद पाडला, वजनकाट्याबद्दल अपप्रचार करून कारखान्याची बदनामी केली. त्यामुळे गाळप कमी झाले. त्यामुळे योग्यवेळी शेतकरीच त्यांचा ‘करेक्ट कार्यक्रम’ करतील. बदनामी थांबवली नाही तर ‘जशास तसे’ उत्तर देवू.

त्यांनी ‘लोकशाही’वर बोलू नये !साखर विक्री समितीच्या सभेत संस्थापक नलवडे यांच्या सह्यांचे अधिकार काढून घेतलेल्या आणि घड्याळाचे काटे फिरवून संचालक मंडळाची ‘मिटींग इज ओव्हर’ असे सांगणाऱ्या शहापूरकरांनी लोकशाहीवर बोलू नये, असा टोला शिंदेंनी लगावला.

गळीत व उत्पन्नाचा लेखा-जोखा (२८ डिसेंबर ते २३ फेब्रुवारी २०२२)ऊस गाळप - ६९२३७ मे. टनसाखर उत्पादन - ७६,८०० क्विंटलस्पिरीट उत्पादन - ३,४६,७५१ लिटर

जमा (लाखात)साखर विक्रीतून - १०७९.८८स्पिरीट विक्रीतून - १५१.०६शिल्लक साखर - १३४९.१२शिल्लक मोलॅसीस - १०५.००शिल्लक स्पिरीट - १९.२० खर्च (लाखात)१५ जानेवारीअखेरची बिले - ७७९.४७तोडणी-वाहतुकीची बिले - ९१.६५व्यापारी बिले - ८५.५१ठेवी परत - १२८.५०कायम कामगार पगार - ७५.५७हंगामी कामगार पगार - २३.३५प्रोसेस काँट्रॅक्टर बिले : २२.९०

देणी (लाखात)ऊस बिले - १२२८.३३तोडणी-वाहतूक बिले - २००.००एकूण - १४२८.३३शिल्लक - ६४.६०

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखाने