यावेळी आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त सुलोचना चिंदके, उज्ज्वला गुरव, भारती सुरंगे, लतादेवी मांगले, स्नेहा पाटील, सारिका बागडी, मेघा बागडी, वैशाली धबाले, सुनीता जाधव, विकास पाटील यांचा सत्कार झाला.
शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यार्थी गुणवत्ता यादीमध्ये आणल्याबद्दल पद्मश्री गुरव, शिवाजी कोंडुस्कर, तानाजी जाधव, अर्चना देसाई, सचिन पाटील, राणबा नाईक, नम्रता पोवार, पंडित सुतार, बी. एस. कांबळे, शैनाज मुल्ला, भगवंता कांबळे, सुवर्णा पोवार यांचाही गौरव करण्यात आला.
यावेळी यंदाचा शिवाजीराव पाटील यांच्या नावाने देण्यात येणारा तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जयश्री रावण, मनोहर कोरवी, सोमगोंडा चिनगोंडा, मल्लाप्पा इंगवले, पार्वती फडतरे, मोहन पाटील, धोंडिबा वांद्रे, सविता कानडे, विष्णू बेनके, शांताराम पाटील, कमल देसाई यांना देण्यात आला.
कार्यक्रमास सुभाष निकम, एम. जे. गोरुले, आर. बी. पाटील, ज्ञानदेव पाटील, विलास माळी, पांडुरंग सुतार, मारुती साबळे, बी. एल. कांबळे, शंकरराव कोले, सुभाष बिरंजे, मधुकर येसणे, आदी उपस्थित होते.
राजेंद्र मांडेकर यांनी प्रास्ताविक केले. किरण गुडशी यांनी सूत्रसंचलन केले. अण्णासाहेब शिरगावे यांनी आभार मानले.