गडहिंग्लज : दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी येथील विविध सामाजिक व समविचारी राजकीय पक्ष संघटना एकत्र आल्या आहेत. आज, शुक्रवारपासून तालुक्यात विविध कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत.येथील साधना प्रशालेत झालेल्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत हा निर्णय झाला.यावेळी जनआंदोलन संघर्ष समितीचे निमंत्रक बाबासाहेब नदाफ यांनी कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली.अध्यक्षस्थानी प्राचार्य जे. बी. बारदेस्कर होते.
२३ ते २८ मार्चअखेर पगडी संभाल जट्टा, अन्यायी कृषी कायद्यांची होळी, ग्रामसभा ठराव संकलन आणि मिट्टी आंदोलन आदी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आंदोलनाला जनतेचा व्यापक पाठिंबा मिळविण्यात येणार आहे.बैठकीस बाळेश नाईक,दिग्विजय कुराडे,अरविंद बारदेस्कर, गणपतराव पाटोळे, इंद्रजीत बनसोडे, सुरेश दास,अर्जुन दुंडगेकर,भीमराव नंदनवाडे, रमजान अत्तार, उज्वला दळवी, अनिल उंदरे, प्रकाश भोईटे, सिद्धार्थ बन्ने, पी. डी. पाटील, फिरोज मुल्ला, भारती सुतार, मेहबूब सनदी,दिलीप कांबळे, रूपाली कांबळे आदी उपस्थित होते.प्रा.ज्ञानराजा चिघळीकर यांनी प्रास्ताविक केले.मनोहर दावणे यांनी आभार मानले.सहभागी पक्ष - संघटना अशाराष्ट्रसेवा दल,छात्रभारती,समाजवादी प्रबोधिनी,अंनिस, कॉ.गोविंद पानसरे विचार मंच,धनगर समाज संघटना, माऊली उद्योग समूह, दानिविप, राष्ट्रवादी, जनता दल, काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी, रिपाइं,