गडहिंग्लज : गडहिंग्लजमधून सुरू झालेल्या देहदान चळवळीस शेजारच्या कर्नाटक व गोव्यातूनही प्रतिसाद मिळाला. हेच या चळवळीचे यश असून ही चळवळ राज्याला मार्गदर्शक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश शिपूरकर यांनी केले.गडहिंग्लजच्या पहिल्या देहदात्या अनुराधा गोकाककर यांचा तिसरा स्मृतिदिन व देहदान चळवळीच्या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार अॅड. श्रीपतराव शिंदे होते.शिपूरकर म्हणाले, गडहिंग्लज ही अनेक चळवळींची भूमी आहे. व्यापक समाजहित व मानवतावादी भूमिकेतून काम करणारे कार्यकर्ते याठिकाणी आहेत. प्रा. किसनराव कुराडे म्हणाले, ‘कसे जगावे व कसे मरावे’ हे गोकाककरांनीच गडहिंग्लजकरांना शिकविले.अनघा कुलकर्णी म्हणाल्या, गडहिंग्लजमधील पहिले देहदाते दाम्पत्य होण्याचा मान आपल्या आई-वडिलांना मिळाला याचा आम्हाला अभिमान आहे. याप्रसंगी प्राचार्य जे. बी. बार्देस्कर, चंदूभाई दोशी, डॉ. एम. एस. बेळगुद्री, बाळेश नाईक, ऊर्मिलादेवी शिंदे, स्वाती कोरी, अकबर मुल्ला, शिवाजी होडगे, सुनील पट्टणशेट्टी, अंगद गोकाककर, आदींसह गोकाककर कुटुंबीय उपस्थित होते.यावेळी झेवियर क्रुझ, अशोक मोहिते व करमळकर गुरुजी यांनी मनोगत व्यक्त केले. सुभाष धुमे यांनी प्रास्ताविक केले. बाळासाहेब मुल्ला यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)देहदात्यांच्या नातेवाइकांचा सत्कारआजरा येथील स्व. ईश्वराप्पा भुसारी आणि हुक्केरी, गोकाक व गोवा येथील देहदात्यांच्या नातेवाइकांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार केला. संकल्पकांना प्रशस्तिपत्राचे वितरणदेहदानाचे संकल्पक झेवियर व रोझ कु्रझ, अशोक व उज्ज्वला मोहिते, प्रा. नवनाथ शिंदे, शारदा अजळकर, सुनंदा गुंडे, दत्तात्रय शिवगंड, आदींना प्रशस्तिपत्रे देण्यात आली.
‘गडहिंग्लज’ची चळवळ राज्याला मार्गदर्शक
By admin | Published: January 02, 2015 10:23 PM