गडहिंग्लज -गडहिंग्लजच्या प्रांताधिकारी विजया पांगारकर व तहसीलदार दिनेश पारगे यांच्या मुदतपूर्व आणि नियमबाह्य बदलीला 'मॅट'न्यायालयाने स्थगिती दिली.कोरोना महामारीत स्वत:च्या जीवाची पर्वा न करता जनतेची काळजी वाहणाऱ्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदलीमुळे गडहिंग्लज विभागात संतप्त प्रतिक्रिया होत्या. अन्यायकारक बदलीसंदर्भात प्रांताधिकारी पांगारकर व तहसीलदार पारगे यांनी 'मॅट'मध्ये दाद मागितली आहे.त्यांच्या अर्जावरील सुनावणीत बदल्यांना स्थगिती मिळाली आहे.दरम्यान, नूतन प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे व तहसिलदार रामलिंग चव्हाण या दोघांनीही येथील आपल्या पदाची सूत्रे हाती घेतली आहेत.त्यामुळे बदल्यांबाबत उलट सुलट चर्चा सुरू होती.'लोकमत'ने उठवला आवाज.!गतवर्षी महापुराच्या काळात आणि त्यानंतर कोरोना महामारीत झोकून देऊन काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बदल्या जनतेच्या भल्याच्या आणि प्रशासनाच्या सोयीच्या नसल्याचे केवळ 'लोकमत'नेच निदर्शनास आणून दिले होते.पहिलीच वेळ...!एकाचवेळी दोन अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली होण्याची व त्याला स्थगिती मिळण्याची गडहिंग्लजच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे.
गडहिंग्लज प्रांताधिकारी, तहसीलदार बदलीला स्थगिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2020 11:14 AM
Gadhinglaj Prantadhikari, Tehsildar transfer postponed, kolhapurnews गडहिंग्लजच्या प्रांताधिकारी विजया पांगारकर व तहसीलदार दिनेश पारगे यांच्या मुदतपूर्व आणि नियमबाह्य बदलीला 'मॅट'न्यायालयाने स्थगिती दिली.
ठळक मुद्देगडहिंग्लज प्रांताधिकारी, तहसीलदार बदलीला स्थगिती 'मॅट'चा आदेश : मुदतपूर्व, नियमबाह्य बदल्यांना दणका