ऑनलाइन पद्धतीने पार पडलेल्या सभेच्या कामकाजात १६० सभासद सहभागी झाले होते. संस्थेसाठी भडगाव रोडवर अद्ययावत इमारत खरेदी केल्याबद्दल आणि कर्जाचा व्याजदर १० टक्के केल्याबद्दल सभासदांनी संचालक मंडळाचे अभिनंदन केले.
संस्थाध्यक्ष दड्डीकर म्हणाले, अहवाल सालात ४७१ सभासद, १३ कोटी २५ लाखांच्या ठेवी, ११ कोटी ५० लाखांची कर्जे, १ कोटी ५१ लाखांचा निधी, ३ कोटी ६६ लाखांची गुंतवणूक आहे. सभासदांना १२.५० टक्के लाभांश दिला आहे. हसूरचंपूच्या सरपंचपदी निवड झाल्याबद्दल संचालिका प्रभावती बागी यांचा सत्कार झाला. विषयपत्रिकेवरील सर्व विषयांना एकमताने मंजुरी देण्यात आली.
सभेस उपाध्यक्षा मंगल पाटील, संचालक प्रभाकर चौगुले, विनायक काटकर, जनार्दन भोईर, व्ही. टी. पाटील, राजेंद्र कोरवी, प्र. व्यवस्थापक गणपती दावणे, वसुली अधिकारी आनंदा सावंत, रोखपाल संतोष रावण, लेखापरीक्षक शिवाजी पाटील, बी. एस. पाटील उपस्थित होते.
-------------------------
फोटो ओळी : गडहिंग्लज पं. स. स्तरावरील जि. प. कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या वार्षिक सभेत संस्थाध्यक्ष राजन दड्डीकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी उपाध्यक्षा मंगल पाटील व संचालक उपस्थित होते.
क्रमांक : २१०३२०२१-गड-०६