कार्यक्रमास उपाध्यक्ष मंगल पाटील, संचालक जनार्दन भोईर यांच्यासह प्रभारी व्यवस्थापक गणपती दावणे, संतोष रावण, आनंदा सावंत उपस्थित होते.
महापुरात ८ गावच्या स्मशानशेडचे नुकसान
गडहिंग्लज :
जुलैमध्ये हिरण्यकेशी नदीला आलेला महापूर व अतिवृष्टीमुळे तालुक्यातील ८ गावच्या स्मशानशेडचे सुमारे ६ लाखांचे नुकसान झाले आहे.
तेरणी, ऐनापूर, कडाल, तनवडी, महागाव, हनिमनाळ, हरळी बुद्रूक व कडलगे येथील स्मशानशेडचे नुकसान झाले आहे.
प्रामुख्याने स्मशान शेडकडे जाणारे रस्ते, अंत्यविधीचे बेड, फरश्या, छताचे पत्रे व भिंती यांचे नुकसान झाले आहे. त्यांच्या दुरुस्तीचा प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे.
घाळी महाविद्यालयात बी.लिब अभ्यासक्रम सुरू
गडहिंग्लज : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या मान्यतेने येथील घाळी महाविद्यालयात 'बी.लिब' या एक वर्षाच्या अभ्यासक्रमांना मंजुरी मिळाली आहे, अशी माहिती प्राचार्य डॉ. मंगलकुमार पाटील यांनी दिली.
हरळी ग्रामपंचायतीतर्फे पूरग्रस्तांना मदत
गडहिंग्लज : हरळी खुर्द येथील पूरग्रस्त कुटुंबांना ग्रामपंचायतीतर्फे जीवनावश्यक वस्तूंची मदत वाटण्यात आली. सरपंच ऊर्मिला पाटील यांच्याहस्ते मदतीचे वितरण झाले.
यावेळी उपसरपंच सिद्धाप्पा पुजारी, अनिकेत नाईक, अरुण पाटील, ग्रामसेवक टी. वाय. हणुमंते, तलाठी एस. बी. लांडगे, निवृत्ती गुरव, बाबूराव पाटील, आनंदा गोईलकर, शिवाजी कोकितकर, चंद्रकांत कुंभार, बसवंत बाणेकर उपस्थित होते.
पॅरामेडिकल अभ्यासक्रम सुरू
गडहिंग्लज : रोहना फाउंडेशनतर्फे शहरात सुरू करण्यात आलेल्या कॉलेज ऑफ पॅरामेडिकलचे उद्घाटन प्रकाश कांबळे व सतीश जाधव यांच्याहस्ते झाले. यावेळी परशराम कांबळे, अजय कांबळे, अरुंधती मांगले, रूपेश रोकडे, अभय वांड्रे, अजित पोवार, अरविंद व्हनाळकर उपस्थित होते.
व्ही. टी. पाटील यांना अभिवादन
गडहिंग्लज : दिवंगत माजी खासदार व्ही. टी. पाटील यांच्या १२१ व्या जयंतीनिमित्त येथील शिवराज महाविद्यालयात अभिवादन करण्यात आले. संस्थाध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे यांनी त्यांच्या आठवणी सांगितल्या. शंकरराव नंदनवाडे यांच्याहस्ते प्रतिमा पूजन झाले.
यावेळी सचिव डॉ. अनिल कुराडे, दिग्विजय कुराडे, बसवराज आजरी, प्राचार्य डॉ. एस. एम. कदम, प्राचार्य संतोष कुरबेट्टी उपस्थित होते.
शिंदे 'शिक्षणशास्त्र'मध्ये व्याख्यान
गडहिंग्लज : येथील दिनकरराव शिंदे शिक्षणशास्त्र महाविद्यालयात डॉ. विद्या पाटील यांचे व्याख्यान झाले. 'ज्ञानेश्वरी : एक जीवनग्रंथ' हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. शिवाजी रायकर होते. रेखा पाटील यांनी आभार मानले.
मुगळीत निधी वाटप
गडहिंग्लज : मुगळी येथील हनुमान दूध संस्था व पार्वती दूध संस्थेतर्फे मिळून सभासदांना ६ लाख ८७ हजार इतक्या भविष्य निर्वाह निधीचे वाटप करण्यात आले. यावेळी बाबासाहेब पाटील, सोमगोंडा पाटील, महादेव मुसळे, श्रीपाद स्वामी, महादेव धनवडे, रायाप्पा धुळाज, नितीन पाटील उपस्थित होते.
'भाजपा'तर्फे सफाई कामगारांना संसारोपयोगी साहित्याचे वाटप
गडहिंग्लज : अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन व माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्मृतीदिनानिमित्त भाजपातर्फे येथील नगरपालिकेच्या ७५ सफाई कामगारांना संसारोपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी शहराध्यक्ष राजेंद्र तारळे, चंद्रकांत सावंत, बेनिता डायस, प्रीतम कापसे, निलांबरी भुइंबर, सुनील पाटील, सुभाष चोथे, तुषार मुरुगडे, शैलेंद्र कावणेकर उपस्थित होते.