नूल : गडहिंग्लज-संकेश्वर या १५ किलोमीटर अंतराचा रस्ता निलजी फाटा ते हेब्बाळच्या गवळी वसाहतीपर्यंत नादुरूस्त झाला होता. याबाबत ''लोकमत''ने वाचा फोडताच शुक्रवारपासून रस्त्याच्या पॅचवर्कचे काम सुरू झाल्याने वाहनधारक व प्रवाशांतून समाधान व्यक्त होत आहे.
या मार्गावरून आजरा, आंबोली, सावंतवाडी, गोवा व कोकणला जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे. संकेश्वर, गडहिंग्लज, आजरा, चंदगड, सेनापती घोरपडेसह कर्नाटकातील साखर कारखान्यांना ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांची रहदारीही या मार्गावरून सुरू असते.
कर्नाटक व महाराष्ट्राला जोडणाऱ्या या मुख्य रस्त्यावरून गडहिंग्लज-संकेश्वर आगाराच्या अनेक बसफेऱ्यांची रहदारी या मार्गावरून सुरू असते. पॅचवर्कचे काम सुरू केल्याने वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे.
----------------------------------
फोटो ओळी : गडहिंग्लज-संकेश्वर रस्त्याचे निलजी ते हेब्बाळदरम्यान सुरू असलेले पॅचवर्क.
क्रमांक : १११२०२०-गड-०४