गडहिंग्लज : शहरातील शिवसह्याद्री प्रतिष्ठानतर्फे मुगळी (ता. गडहिंग्लज) येथे पोल्ट्रीची भिंत कोसळून मृत्युमुखी पडलेल्या नांगनूर येथील कांबळे कुटुंबीयांच्या नातेवाइकांना शिधा स्वरूपात अन्नधान्याची मदत केली. या वेळी विनायक इंदुलकर, महेश गुंडली, शाहीद खणदाळे, तुषार कांबळे, निरंजन पाटील, विनायक नाईक, सौरभ तोडकर आदी उपस्थित होते.
--------------------
२) गडहिंग्लजमध्ये प्रशासकीय सेवा महाविद्यालय सुरू
गडहिंग्लज : येथील प्रशासकीय सेवा महाविद्यालयाच्या फलकाचे अनावरण उपनगराध्यक्ष महेश कोरी यांच्या हस्ते झाले. या वेळी एम. जी. पाटील, प. ग. पाटील, नगरसेविका क्रांती शिवणे, आप्पा शिवणे आदी उपस्थित होते.
------------------------
३) बड्याचीवाडीकरांना दिलासा
गडहिंग्लज : बड्याचीवाडी येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुपरस्प्रेडरांची तपासणी करण्यात आली. गावातील दूध व सेवा संस्था, शेतीविषयक साहित्य विक्रेते, हॉटेलचालक, पिठाची व किराणा दुकानदार, केशकर्तनालय, भाजीपाला, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस, शिक्षक व ग्रामपंचायत स्तरावरील कर्मचारी अशा एकूण ८८ जणांची तपासणी करण्यात आली. यामध्ये कोणीही बाधित न मिळाल्याने गावकऱ्यांना दिलासा मिळाला. या वेळी सरपंच सतीश कोळेकर, उपसरपंच सुनीता दळवी, ग्रामसेवक संदीप तोरस्कर आदी उपस्थित होते.
------------------------
४) कोवाडमध्ये साहित्य वाटप
कोवाड : कोवाड (ता. चंदगड) येथील ग्रामपंचायतीतर्फे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना पावसाळी ड्रेस आणि गणवेश वाटप ग्रामविकास अधिकारी जी. एल. पाटील यांच्या हस्ते देण्यात आले. या वेळी चंद्रकांत सुतार, मारुती नाईक, नारायण कांबळे आदी उपस्थित होते.
-------------------------
५) गडहिंग्लजमध्ये कोरी यांचा सत्कार
गडहिंग्लज : कोरोना संसर्ग रोखणे, कोरोना रुग्णांवर वेळेत उपचार मिळावेत, तसेच मृत रुग्णांवर विधिवत अंत्यसंस्कार याचे उत्तम नियोजन करणारे उपनगराध्यक्ष महेश कोरी यांचा भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्या हस्ते सत्कार झाला.
या वेळी कोरोना रुग्णांवर मोफत जेवण देणारे रिंगणे बंधू, गावाबाहेरील लक्ष्मी मंडळ, उदय परीट, सुनील साळुंखे, बाजारपेठ व्यापारी मंडळ, पॅव्हेलियन कोविड सेंटर व मनसे अलगीकरण कक्ष यांच्या कार्याचेही कौतुक केले.
या वेळी राजेंद्र तारळे, प्रीतम कापसे, चंद्रकांत सावंत, आप्पासाहेब पाटील, विठ्ठल भमानगोळ, शैलेंद्र कावणेकर, तुषार मुरगुडे, अमर पोटे, रोहित पाटील, रोहित पोटजाळे आदी उपस्थित होते.