गडहिंग्लज : अग्रणी महाविद्यालय योजनेंतर्गत येथील शिवराज महाविद्यालय व डॉ. घाळी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाईन कार्यशाळा पार पडली. प्राचार्य डॉ. मंगलकुमार पाटील यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन झाले. ‘शेतीपूरक व्यवसाय - मधुमक्षिका पालन’ या विषयावर डॉ. मनोज गडाले यांनी मार्गदर्शन केले. प्रा. अनिल मगर यांनी प्रास्ताविक केले. डॉ. अश्विन गोडघाटे यांनी सूत्रसंचालन केले तर डॉ. शिवानंद मस्ती यांनी आभार मानले.
- २) डॉ. घाळी यांना अभिवादन
गडहिंग्लज : औरनाळ येथील न्यू होराईझन स्कूलमध्ये विद्याप्रसारक मंडळाचे संस्थापक डॉ. एस. एस. घाळी यांची १०० वी जयंती साजरी करण्यात आली. मुख्याध्यापिका सुनीता पाटील व प्रा. शंकर मगदूम यांच्या हस्ते पुतळ्याचे पूजन झाले. यावेळी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
- ३) ईद साधेपणाने साजरी करा
गडहिंग्लज : कोरोना व डेंग्यू साथीच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम बांधवांनी बकरी ईद साधेपणाने घरीच साजरी करावी, असे आवाहन येथील संयुक्त बैठकीत करण्यात आले. सुन्नी जुम्मा मस्जिद, मोहम्मदीया अरबी मदरसा व मदिना मस्जिद पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत हे आवाहन करण्यात आले. यावेळी मौलाना आजीम पटेल, राजू खलिफ, आशपाक मकानदार, कबीर मुल्ला, मुन्ना सय्यद, आदी उपस्थित होते.
-- ४) ‘ओंकार’मध्ये राष्ट्रीय वेबिनार
गडहिंग्लज : येथील ओंकार शिक्षण संस्था संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय वेबिनार पार पडले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. सुरेश चव्हाण होते. ‘नॅक प्रक्रियेत प्रशासकीय कर्मचाऱ्यांची भूमिका’ या विषयावर डॉ. एन. व्ही. पोवार यांनी मार्गदर्शन केले. प्रा. धर्मवीर क्षीरसागर यांनी प्रास्ताविक केले. काशिनाथ तनंगे यांनी अतिथींचा परिचय करून दिला. सुरेश धुरे यांनी आभार मानले. ग्रंथपाल समीर कुलकर्णी यांनी तंत्र सहाय्यकाची बाजू सांभाळली.
- ५) शिंत्रे परिवारातर्फे ‘होम’ला मदत
गडहिंग्लज : स्व. अर्जुन शिंत्रे यांच्या स्मरणार्थ शिंत्रे परिवार व सारथी फाऊंडेशनतर्फे एड्सग्रस्त मुलांसाठी होप फाऊंडेशनला प्रोटीनयुक्त आहाराच्या किटचे वाटप करण्यात आले. पोलीस उपअधीक्षक गणेश इंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. प्रा. सुनील शिंत्रे यांनी प्रास्ताविक केले. अमोल देसाई यांनी स्वागत केले. नगरसेविका श्रद्धा शिंत्रे यांनी आभार मानले. यावेळी डॉ. पी. पी. पाटील, वसंत यमगेकर, अनंत पाटील, नचिकेत भद्रापूर, नागेश चौगुले, शिवाजीराव भुकेले, बाळासाहेब गुरव, महेश सलवादे, आदी उपस्थित होते.