गडहिंग्लज : इंचनाळ (ता. गडहिंग्लज) येथील प्राचीन गणेश मंदिरातील श्रींच्या मूर्तीला सुवर्णभस्म लेपण महाविधीसाठी माजी उपसरपंच सुजितसिंह देसाई यांनी २१ हजारांची देणगी दिली.
यावेळी देवस्थान समिती अध्यक्ष नारायण पाटील, सरपंच उत्तम कांबळे, उपसरपंच उदय देसाई, सचिन पाटील, सयाजी देसाई, शिवाजी राणे, दत्तात्रय जाधव, उत्तम पाटील, वसंत दंडगे, ग्रामसेवक सुरेश गुरव उपस्थित होते.
-
- २) महागाव येथे लिंगायत दफनभूमी दुरुस्तीस प्रारंभ
गडहिंग्लज : महागाव (ता. गडहिंग्लज) येथील वीरशैव लिंगायत समाज दफनभूमी दुरुस्तीच्या कामास महारुद्र तौकरी यांच्या हस्ते प्रारंभ झाला. या कामी जि. प. सदस्या राणी खमलेट्टी यांच्या फंडातून ४ लाख रुपये मिळाले आहेत. यावेळी दीपक जमदाडे, तम्माण्णा सोमशेट्टी, सुभाष खानापुरे, वीरपाक्ष खानापुरे, तम्माण्णा उत्तुरे, राजेंद्र वाली, अशोक मगदूम, उदय सोमशेट्टी उपस्थित होते.
--
-- ३) सर्वोदय पतसंस्थेला ८ लाखांचा नफा
गडहिंग्लज : हालेवाडी (ता. आजरा) येथील सर्वोदय सहकारी पतसंस्थेला गत आर्थिक वर्षात ८ लाखाचा नफा झाल्याचे अध्यक्ष अशोक पाटील यांनी वार्षिक सभेत सांगितले.
ते म्हणाले, संस्थेकडे ८ कोटी ८६ लाखांच्या ठेवी असून ४ कोटी १९ लाखांची कर्जे वाटली आहेत. सभासदांना १० टक्के लाभांश देण्यात आला आहे.
यावेळी उपाध्यक्ष गणपती खोराटे, संचालक सुनील पाटील, सुनील डोणकर, बळवंत ढोकरे, रमेश कांबळे उपस्थित होते. संचालक विलास पाटील यांनी स्वागत केले. सचिव सुनील पन्हाळकर यांनी आभार मानले.
-
--- ४) महागावात पाणंद रस्ता रुंदीकरणास प्रारंभ
महागाव : येथील संत गजानन महाराज हॉस्पिटल ते घळीचा मार्ग दरम्यानच्या पाणंद रस्ता रुंदीकरणाच्या कामास सरपंच ज्योत्स्ना पताडे व डॉ. यशवंत चव्हाण यांच्या हस्ते प्रारंभ झाला. यावेळी अमर कडाकणे, भारत कुंभार, सखाराम राणे, विजय पन्हाळकर, रावसाहेब राणे, ग्रामविकास अधिकारी शशीकांत कुंभार, तलाठी युवराज सरनोबत उपस्थित होते. सुरेश रेडेकर यांनी आभार मानले.
---- ५) भादवणमध्ये तुकाराम बीज उत्साहात
गडहिंग्लज : भादवण (ता. आजरा) येथे तुकाराम बीज साधेपणाने पार पडला. आजरेकर फडाचे प्रमुख संदीप कोंडकर यांची प्रमुख उपस्थिती होती. नामदेव सुतार यांच्या घरी हा कार्यक्रम झाला. यावेळी फडाचे चोपदार चंद्रकांत पाटील यांच्यासह भादवण व साळगाव येथील वारकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.