हलकर्णी : तेरणी (ता. गडहिंग्लज) येथे कृषी विभागामार्फत कृषी संजीवनी सप्ताह पार पडला. कृषी विभागाच्या विविध योजना व पोर्टलबाबत जनजागृती व कृषिक या मोबाईल अॅपचा प्रभावी वापर करण्याबद्दल तालुका कृषी अधिकारी हरिदास बोंगे यांनी मार्गदर्शन केले.
बीजप्रक्रिया करण्याचे मार्गदर्शनासह सोयाबीन पिकामधे ब्रॉड बेड फरो तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यासाठी कृषिसेवक अमित शिंदे यांनी तर सोयाबीन टोकण यंत्रांचा प्रभावी वापर करून बियाणे आणि खतांची बचत कशी करता येईल याबाबत कृषिसेवक विलास गुजर यांनी प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले.
यावेळी सरपंच मोहसीन मुल्ला, कृषी पर्यवेक्षक हरिश्चंद्र सिताप, ग्रामसेवक अशोक शेळके, उपसरपंच आक्काताई हजेरी, करवीर उथले, कृषी सहाय्यक दीपाली कुंभार, समाधान काशीद व ग्रामस्थ उपस्थित होते.
------------------------
२) हलकर्णी-संकेश्वर बससेवा सुरू
हलकर्णी : गडहिंग्लज तालुक्यातील पूर्वभागातील प्रवाशांना वरदान असलेली व कोल्हापूर-बेळगांवच्या नियमित प्रवास करणाऱ्यांना प्रतीक्षा असलेली हलकर्णी-संकेश्वर ही सिटी बस बुधवारपासून सुरू झाली. भाजीपाला, जनावरे बाजार, यासह नोकरदार यांच्यासाठी ही बस महत्त्वाची आहे.
--------------------------
३) स्टेशनरीचे दुकाने उघडण्यास परवानगी द्या
गडहिंग्लज : कोरोनामुळे गेल्या दोन महिन्यांपासून बंद असलेले बुक स्टॉल व स्टेशनरीची दुकाने सकाळी ७ ते दुपारी ४ यावेळेत सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी भाजपाने मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर यांच्याकडे निवेदनातून केली आहे.
शिष्टमंडळात, प्रीतम कापसे, विठ्ठल भमानगोळ, चंद्रकांत सावंत, वरूण गोसावी, युवराज बरगे, रोहित पोडजाळे, प्रमोद देवेकर, स्वप्निल पाटील आदींचा समावेश होता.
-------------------------
४) 'ओंकार' मध्ये नव्या अभ्यासक्रमास मान्यता
गडहिंग्लज : ओंकार शिक्षण संस्थेच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयास वाणिज्य शाखेचा पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यास शासनाची मान्यता मिळाली आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्र. प्राचार्य डॉ. सुरेश चव्हाण यांनी केले आहे.
------------------------
५) निंगुडगेमध्ये मास्कचे वितरण
गडहिंग्लज : निंगुडगे (ता. आजरा) येथे गरीब व गरजूंना ओंकार महाविद्यालयातर्फे ५०० मास्क सरपंच कृष्णा कुंभार यांच्याकडे सुपुर्द करण्यात आले. यावेळी संस्थाध्यक्ष राजन पेडणेकर, प्र. प्राचार्य सुरेश चव्हाण, काशिनाथ तनंगे, धर्मवीर क्षीरसागर, प्रकाश कांबळे, रवींद्र देसाई, आप्पासाहेब देसाई, आरती जाधव, सुभाष कांबळे आदी उपस्थित होते.