गडहिंग्लज : गिजवणे (ता. गडहिंग्लज) येथील मूकबधिर निवासी शाळेच्या विद्यार्थ्यांना संगीता आप्पा जाधव (हणमंतवाडी) त्यांनी अमोल जाधव यांच्या स्मरणार्थ शैक्षणिक साहित्य भेट दिले. यावेळी संस्थाध्यक्ष सतीश पाटील, उपाध्यक्ष बाळासाहेब घुगरे, सचिव भिकाजी जाधव, मुख्याध्यापिका सरिता रजपूत, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
२) गडहिंग्लजमध्ये स्पोर्टस् पदाधिकाऱ्यांचा सत्कार गडहिंग्लज : शहरातील काळभैरव रोडवरील स्वामी विवेकानंद स्पोर्टस्च्या नूतन पदाधिकाऱ्यांचा उपनगराध्यक्ष महेश कोरी यांच्याहस्ते सत्कार केला. यावेळी दयानंद पाटील यांच्याहस्ते स्पोर्टस्ला क्रीडा साहित्य देण्यात आले. यावेळी महेश केसरकर, किरण सोनटक्के, राजू मोहिते, प्रकाश पाटील, प्रवीण तेलवेकर आदी उपस्थित होते.
-
३) तुर्केवाडीत बुधवारपासून उत्सव
चंदगड : तुर्केवाडी (ता. चंदगड) येथील ग्रामदैवत सोपानदेव पुण्यतिथी उत्सव बुधवार दि. ६ ते १२ जानेवारीअखेर आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त दररोज काकड आरती, ज्ञानेश्वरी पारायण, महिला भजनी मंडळाचे भजन, हरिपाठ, प्रवचन, कीर्तन आदी धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.
-- ४) कागणी येथे सभासदांना लाभांश वाटप
कोवाड : कागणी (ता. चंदगड) येथील लक्ष्मी विकास सेवा संस्थेकडून सभासदांना ८ टक्केप्रमाणे लाभांश वाटप करण्यात आले. संस्थेला चालू वर्षात ६ लाख २९ हजाराचा नफा झाला असून त्यापैकी १ लाख १२ हजार धान्य विभागाचा नफा झाला आहे. यावेळी अध्यक्ष शामराव देसाई, उपाध्यक्ष सटुप्पा बाचूळकर यांच्यासह संचालक उपस्थित होते.
-----
५) हलकर्णीत रक्तदान शिबिरास प्रतिसाद
चंदगड : हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत विश्वस्त संस्थेच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालय व गुरुवर्य गुरुनाथ विठ्ठल पाटील कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे रक्तदान शिबिर पार पडले. शिबिरात २५ रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. अध्यक्षस्थानी प्र. प्राचार्य डॉ. अनिल गवळी होते. यावेळी संजय पाटील, सी. एम. तेली, डॉ. चंद्रकांत पोतदार, डॉ. राजेश घोरपडे, डॉ. जे. जे. व्हटकर आदी उपस्थित होते.
-- ४) आयटीआय प्रवेशासाठी वाढीव फेरी
गडहिंग्लज : आयटीआय प्रवेशासाठी संस्था स्तरावर वाढीव फेरी करण्याचा निर्णय झाला आहे. नव्या विद्यार्थ्यांना यात संधी देण्यात येणार असून पूर्वी अर्ज केलेल्यांना दुरुस्ती करण्याची तरतूद आहे. त्याचे वेळापत्रक जाहीर झाले असून सोमवार (४) अखेर अर्ज करणे, मंगळवार (५) गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणार आहे, तर खासगी संस्थांत ८ ते १५ जानेवारीअखेर प्रवेश दिले जाणार आहेत. ऑनलाईन केंद्रीय पद्धतीने १ ऑगस्टपासून प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.