गडहिंग्लज : कोल्हापूर जिल्हा ग्रामस्थ प्रतिष्ठान मुंबई व ज्वेलेक्स फौंडेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने कोल्हापूर जिल्ह्यातील नांगनूर, अरळगुंडी, गरजगाव येथील ५०० पूरबाधित कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष प्रवीण देसाई, राजेंद्र निकम, उपाध्यक्ष बाजीराव देवरकर, स्वप्निल मुसळे, राहुल देसाई, श्रीकांत यादव आदी उपस्थित होते.
------------ २) नूलमध्ये हनुमान मूर्तीची प्रतिष्ठापना
नूल : नूल (ता. गडहिंग्लज) येथील ग्रामदैवत हनुमान मंदिरात नूतन हनुमान मूर्तीची विधीपूर्वक उत्साहात प्रतिष्ठापना करण्यात आली. सुरगीश्वर मठाचे मठाधिपती चंद्रशेखर शिवाचार्य स्वामीजी यांच्या सान्निध्यात मठाधिपती गुरुसिद्धेश्वर शिवाचार्य स्वामीजी, रामनाथगिरी समाधी मठाचे मठाधिपती भगवानगिरी महाराज यांच्याहस्ते मूर्ती प्रतिष्ठापना झाली.
गणेश जंगम, महादेव हिरेमठ यांनी पौरहित्य केले. यावेळी श्रीपतराव शिंदे, रामगोंडा पाटील, धोंडीबा शिंदे, रामगोंडा पाटील, सरपंच प्रियांका यादव, उपसरपंच प्रियांका शिंदे आदी उपस्थित होते.
-
------ ३) 'शिवराज'मध्ये राष्ट्रीय चर्चासत्र
गडहिंग्लज : येथील शिवराज महाविद्यालयात समाजशास्त्र विभागातर्फे 'संशोधन लेखन कौशल्ये' या विषयावर राष्ट्रीय ऑनलाईन चर्चासत्र पार पडले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एस. एम. कदम होते.
टाटा समाजविज्ञान संस्थेचे डॉ. संपत काळे यांनी 'संशोधन प्रकल्प प्रस्ताव : लेखन आणि अंमलबजावणी', डॉ. घनशाम येळणे यांनी 'संशोधन अहवाल लेखनपद्धती' या विषयावर मार्गदर्शन केले.
-- ४) कडलगे येथे पूरग्रस्तांना मदत
गडहिंग्लज : कडलगे येथील पूरग्रस्तांना शिवसह्याद्री प्रतिष्ठानतर्फे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सतीश पेडणेकर, सुनील बोरनाक, संदीप मेंगाणे, विनायक इंदूलकर, सहदेव कोरे, सागर घोटणे, विनोद येसादे, सर्जेराव पाटील आदी उपस्थित होते.