गिजवणे (ता. गडहिंग्लज) येथील श्री केदारलिंग मंदिरानजीकच्या हिरण्यकेशी नदीकाठावरील जॅकवेलद्वारे गडहिंग्लज शहराला नळपाणी पुरवठा केला जातो. दरम्यान, जॅकवेलच्या विद्युत पुरवठ्याचे जनित्र महापुराच्या पाण्यात ६० टक्के बुडाल्यामुळे नळपाणी पुरवठा बंद ठेवण्यात आला होता. दरम्यान, काही ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला.
रविवारी (२५) दुपारी नगराध्यक्षा स्वाती कोरी, उपनगराध्यक्ष महेश कोरी, पक्षप्रतोद बसवराज खणगावे, नगरसेवक नरेंद्र भद्रापूर, पाणीपुरवठा अभियंता अनिल गंदमवाड व विद्युत अभियंता धनंजय चव्हाण, सूरज कुंभार, ‘महावितरण’चे उपकार्यकारी अभियंता सागर दांगट, सहायक अभियंता श्रीपाद चिकोर्डे व सहकाऱ्यांनी जॅकवेल परिसरातील पूरपरिस्थितीची समक्ष पाहणी केली. त्यानंतर विद्युत पुरवठा सुरळीत करून नळपाणी पुरवठा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
फोटो ओळी : गडहिंग्लज शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गिजवणे (ता. गडहिंग्लज) येथील हिरण्यकेशी नदीकाठावरील जॅकवेल व जनित्रामधील विद्युत बिघाड काढताना महावितरण कंपनीचे कर्मचारी.
क्रमांक : २५०७२०२१-गड-१०