गडहिंग्लज : सर्व व्यवसाय, दुकाने सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सच्या व्यापाऱ्यांनी केली आहे. आज, गुरुवारी दुपारी १२ वाजेपर्यंत दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय गडहिंग्लज चेंबर ऑफ कॉमर्सच्या बैठकीत झाला.
यावेळी गडहिंग्लज शहर किराणा भुसार व्यापारी संघटनेचे सचिव राजेंद्र बस्ताडे, सराफ व सुवर्णकार असोसिएशनचे श्रीनिवास वेर्णेकर, बेकरी व स्वीट मार्ट असोसिएशनचे दीपक कोळकी, हॉटेल व परमीट रूम असोसिएशनचे अध्यक्ष अवधूत पाटील, कोल्ड ड्रिंक्स असोसिएशनचे बसवराज जंगपन्नावर, कापड दुकानदार संघटनेचे प्रवीण पावले, राजेंद्र बस्ताडे आदींसह शहरातील सर्व व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. गडहिंग्लज शहर आणि परिसरातील सर्व व्यवसाय व दुकाने सुरू करण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. अध्यक्षस्थानी गडहिंग्लज चेंबर ऑफ कॉमर्सचे कार्याध्यक्ष राजेश बोरगावे होते.