मुश्रीफ म्हणाले, गडहिंग्लज शहरातील झोपडपट्टयांच्या नियमितीकरणांबरोबरच बेघरांना हक्काचे घर उपलब्ध करून देण्यासाठी कागलच्या धर्तीवर घरकुल योजना राबविण्याचा आपला मानस आहे.
गडहिंग्लजच्या रानभागासाठी हिरण्यकेशी नदीवरून राबविण्यात आलेली नळपाणी पुरवठा योजना न परवडणारी आहे. त्यामुळे रानभागाला शेंद्री तलावातील पाणी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू, अशी ग्वाही मुश्रीफ यांनी यावेळी दिली.
माजी जि. प. उपाध्यक्ष सतीश पाटील, नगरसेवक हारुण सय्यद, दीपक कुराडे, सिद्धार्थ बन्ने, सूरज कांबळे, विजय बनगे यांचीही भाषणे झाली. महेश सलवादे यांनी स्वागत केले. नगरसेविका रेश्मा कांबळे यांनी आभार मानले. मेळाव्यास उदय जोशी, शिवप्रसाद तेली, वसंत यमगेकर, सुरेश कोळकी, मंजुषा कदम, शुभदा पाटील, शर्मिली पोतदार आदींसह कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यकर्त्यांची टीका..मुश्रीफांचे मौन..!
मेळाव्यात माजी उपनगराध्यक्ष किरण कदम व राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सिद्धार्थ बन्ने यांनी पालिकेतील सत्ताधारी जनता दलाच्या कारभारावर जोरदार टीका केली. मात्र, मंत्री मुश्रीफ यांनी त्याबाबत मौन पाळले.
फोटो ओळी : गडहिंग्लज येथे कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्याहस्ते रस्ता डांबरीकरण कामाचा प्रारंभ झाला. यावेळी सतीश पाटील, किरण कदम, हारुण सय्यद, सिद्धार्थ बन्ने, राजू जमादार आदी उपस्थित होते.
क्रमांक : ०४०९२०२१-गड-१४