कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्यविषयक विविध उपक्रमातून गडहिंग्लजकरांनी ग्रामविकास व कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यानिमित्त रक्तदान शिबिर, सॅनिटायझर व मास्क वाटप व आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले.
शहरातील राष्ट्रवादी कार्यालयात आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन राज्य मजूर फेडरेशनचे संचालक उदय जोशी व माजी उपनगराध्यक्ष किरण कदम यांच्याहस्ते झाले. या शिबिरात १५१ कार्यकर्त्यांनी रक्तदान केले. सेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी माजी नगराध्यक्ष वसंत यमगेकर व मंजुषा कदम, राष्ट्रवादी चंदगड विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष रामाप्पा करिगार, शहराध्यक्ष सिद्धार्थ बन्ने, युवक राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष महेश सलवादे, शहराध्यक्ष गुंड्या पाटील, नगरसेविका रेश्मा कांबळे, सुरेश कोळकी, महाबळेश्वर चौगुले, शिवप्रसाद तेली, अमर चव्हाण, जयकुमार मुन्नोळी, जयसिंग चव्हाण, तानाजी शेंडगे, राजेश पाटील, लक्ष्मण तोडकर, अभिजित पाटील, डॉ. किरण खोराटे, राकेश पाटील, रफिक पटेल, राजू जमादार, रश्मीराज देसाई, अमर मांगले, सुनीता नाईक, शबाना मकानदार, अरुणा कोलते, श्रीया कोणकेरी, बनश्री चौगुले, मनीषा तेली, अवधूत रोटे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान, गडहिंग्लज नगरपालिकेचे स्वच्छता कामगार व गडहिंग्लज टपाल कार्यालयातील कर्मचाऱ्यांना सॅनिटायझर व मास्कचे वाटप करण्यात आले.
----------------------
फोटो ओळी : गडहिंग्लज येथे नगरपालिका स्वच्छता कामगारांसाठी मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर यांच्याकडे सॅनिटायझर व मास्क सुपुर्द करण्यात आले. यावेळी सिद्धार्थ बन्ने, वसंतराव यमगेकर, किरण कदम, गुंड्या पाटील, महेश सलवादे, दीपक कुराडे, बाळासाहेब घुगरे आदी उपस्थित होते. (मज्जीद किल्लेदार)
क्रमांक : २१०४२०२१-गड-१५